Friday, August 21, 2026
Homeपेयजल समस्यामूल शहर भारतीय जनता पार्टी तर्फे बुधवार ला घागर मोर्चा
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल शहर भारतीय जनता पार्टी तर्फे बुधवार ला घागर मोर्चा

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )
मूल शहरात वारंवार होणारा अनियमित पाणीपुरवठा नागरिकांना भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि नगरपरिषद प्रशासनाच्या होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ  भारतीय जनता पार्टी, मूल शहर यांच्या वतीने  17 जून 2026 ला घागर मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
हा मोर्चा बुधवार दिनांक 17 जून 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता रामलीला भवन, मूल येथून सुरू होऊन नगर परिषद, मूल येथे धडकणार आहे.
मूल शहरातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा मिळावा, पाणी समस्येचे तात्काळ निराकरण व्हावे ,तसेच जनतेच्या मूलभूत हक्कासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे.
भारतीय जनता पार्टी, मूल शहर यांच्या वतीने सर्व नागरिक, महिला, युवक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घागर मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!