Wednesday, October 21, 2026
Homeरोजगार मेळावामुल येथील कर्मवीर महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मुल येथील कर्मवीर महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

     जिल्ह्यातील 10 वी, आय टी आय,पदविका, पदवी इत्यादी उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील नामांकित उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर आणि कर्मवीर महाविद्यालय, मुल यांच्या संयुक्त विद्यमाने 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता कर्मवीर महाविद्यालय, मुल येथे महाराष्ट्र शासन पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व इतर एकूण 22 पदे भरण्यात येणार असून विविध नामांकित कंपन्या सहभागी होत आहे. मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या प्रतीत्सह (कमीत कमी तीन प्रती उपस्थित राहावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेण्याकरीता पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर चे सहायक आयुक्त, यांनी केले आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!