Friday, June 19, 2026
Homeकर्ज प्रस्ताव प्रक्रियाकृषी महाविद्यालय मुल च्या कृषी कन्यांनी बँक कर्जासाठी प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया...

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कृषी महाविद्यालय मुल च्या कृषी कन्यांनी बँक कर्जासाठी प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया जाणून घेतली

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत “RAWE वित्तीय संस्थांचा अभ्यास आणि बँक प्रस्ताव तयार करण्याचा उपक्रम”व “ग्रामीण भागातील वित्तीय संस्थांची माहिती व बँक प्रस्ताव तयार करण्याचा अभ्यास” इत्यादी प्रकारची माहिती पळसगाव जाट येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक च्या शाखा व्यवस्थापकाकडून जाणून घेतली. या उपक्रमात कृषी महाविद्यालयाच्या कु.वैष्णवी पंधरे, कु.आचल मते कु.स्वाक्षरी खोब्रागडे  आणि कु.मुस्कान पांडे या विद्यार्थिनींनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला
शाखा व्यवस्थापक यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार बँक कर्ज प्रस्तावाची प्रक्रिया” बँकेकडून कर्ज घेण्यासाठी कर्ज प्रस्ताव (Loan Proposal) सादर करण्याची प्रक्रिया सांगितली.याबाबत त्यांनी सांगितले की कर्जाची गरज निश्चित करा, कर्ज किती रकमेचे हवे आहे? कर्जाचा उद्देश काय आहे?
परतफेडीची क्षमता, विविध बँकांच्या व्याजदरांची तुलना करा,कर्जाच्या अटी व शर्ती समजून घ्या. कर्ज घेण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे तयार करा.
कर्ज प्रस्ताव तयार करून बँकेत सादर केल्यानंतर  बँकेकडून कागदपत्रांची पडताळणी,क्रेडिट हिस्ट्री तपासणी, तारण मालमत्तेचे मूल्यांकन आदींची तपासणी केल्यानंतर,कर्ज मंजूर झाल्यास मंजुरीपत्र दिले जाते. बँकेकडून व्यवसायासाठी, शेतीसाठी,वाहन घेण्यासाठी अशा वेगवेगळ्या कारणासाठी कर्ज दिले जाते.
हा उपक्रम कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता वि. जी. अतकरे, यांच्या प्रेरणेतून आणि समन्वयक डॉ. आर. पी.गजभिये, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविणा बरडे, यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पूर्ण केला

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!