Friday, August 21, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025विश्वासाची मुहर — प्रभाग 5 ने निवडला आपला युवा नेता "ऋतिक गोयल"
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

विश्वासाची मुहर — प्रभाग 5 ने निवडला आपला युवा नेता “ऋतिक गोयल”

image_pdfimage_print

मूल

नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मध्ये काँग्रेस पक्षाचा जोरदार प्रचार झंझावात सुरू आहे. प्रभागातून शिक्षित तरुण नेतृत्व म्हणून ऋतिक दिनेश गोयल मैदानात असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस ज्येष्ठ नेते संतोष सिंह रावत यांच्या मार्गदर्शनात व नगराध्यक्ष पदासाठीच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ. एकता प्रशांत समर्थ यांच्या नेतृत्वाखाली हा प्रभाग काँग्रेसच्या बाजूने एकजीव होत असल्याचे चित्र दिसत आहे.

प्रभागात काही प्रतिस्पर्ध्यांकडून जातीय तसेच भावनिक कार्ड खेळण्याचे प्रयत्न झाले असले, तरी ते मतदारांना अपेक्षित वाटले नाहीत. उलट,एकता समर्थ यांचे पती प्रशांत समर्थ यांचा प्रभागातील मजबूत जनाधार आणि तरुण चेहरा म्हणून उदयास आलेले ऋतिक गोयल यांच्या लोकप्रियतेमुळे काँग्रेसला भक्कम आघाडी मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने ऋतिक दिनेश गोयल यांना ‘युवा नगरसेवक’ म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. प्रभागाच्या समस्या थेट नगरपरिषदेत मांडून विकासाला गती देण्याची क्षमता ऋतिककडे आहे, असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रभाग 5 मधुन ऋतिक गोयल शंभर टक्के विजयी होतील, असा दृढ विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. एकता समर्थ यांना या प्रभागातून ‘हायेस्ट लीड’ मिळण्याचीही शक्यता प्रबल असून, प्रभाग 5 काँग्रेसच्या विजयाचा ‘डिसायडिंग फॅक्टर’ ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

एकूणच, या निवडणुकीत मूल नगरपरिषदेत उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेस पक्ष पूर्ण फॉर्ममध्ये दिसत असून, प्रभाग 5 मधुन मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद काँग्रेसच्या झेंड्याला नवी उंची देऊ शकतो, अशी चर्चा शहरात रंगत आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!