Saturday, August 22, 2026
Homeगॅस सिलेंडर समस्यामूल शहरातील गॅसधारकांना 45 दिवसाऐवजी 25 दिवसात गॅस सिलेंडर पुरवठा व्हावा
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल शहरातील गॅसधारकांना 45 दिवसाऐवजी 25 दिवसात गॅस सिलेंडर पुरवठा व्हावा

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

मूल शहरातील गॅस धारकांना 45 दिवसाऐवजी 25 दिवसात गॅस सिलेंडर चा पुरवठा व्हावा, यासाठी वारंवार मागणी करून सुद्धा गॅस धारकांची ही मागणी अजून पावेतो पूर्ण झाली नाही. त्यामुळे गॅस एजन्सी प्रशासनाने ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी, याबाबत माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ता मोतीलाल टहलियानी तसेच भाजयुमो चे उपाध्यक्ष सुरज मांदाडे यांनी मागणी केली आहे.

          मुल येथील गॅस एजन्सी काही कारणाने बंद झाली होती, त्यामुळे सावली येथील एजन्सी मार्फत मूल शहरात सिलेंडर पुरवठा केला जात होता.आता मात्र मूल शहरात एजन्सी सुरू झालेली आहे. एकंदरीत मूल शहर तालुक्याचे क्षेत्र असल्यामुळे गॅसधारकांना 25 दिवसात गॅस सिलेंडर मिळावयास पाहिजे. परंतु अजूनही 45 दिवसानंतर गॅस सिलेंडर मिळत आहे.या संदर्भात मोतीलाल टहलियानी यांनी या क्षेत्राचे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना पत्र दिले होते. त्या अनुषंगाने मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना 6 मे रोजी आणि केंद्रीय पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस मंत्री यांना 24 जून रोजी पत्र दिले आहे. तरी सुद्धा याबाबत वरिष्ठ स्तरावरून कुठलीही मागणी पूर्ण झालेली नाही.

        यामुळे गॅसधारकांना बऱ्याच अडचणी येत आहेत. म्हणूनच गॅसधारकांच्या अडचणी सोडविण्यासाठी या मागणीकडे तातडीने लक्ष द्यावे, असे म्हटले जाते.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!