Thursday, August 20, 2026
Homeबँकेला भेटशेतकरी योजनांवर चर्चा कार्यक्रम संपन्न. कृषी महाविद्यालय मुल च्या विद्यार्थ्यांनी...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

शेतकरी योजनांवर चर्चा कार्यक्रम संपन्न. कृषी महाविद्यालय मुल च्या विद्यार्थ्यांनी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शैक्षणिक भेट

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

        ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय मुल च्या विद्यार्थ्यांनी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भेट देऊन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांवर चर्चा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती शाखा व्यवस्थापक अनिल श्रीरामे यांनी दिली.

चर्चेदरम्यान पीक कर्ज योजना, किसान क्रेडिट कार्ड (KCC), पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना तसेच पशुसंवर्धन व सिंचन योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बँक अधिकाऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया समजावून सांगितली.
उपस्थित विद्यार्थ्यांनी विविध योजनांबाबत प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या चर्चेमुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यास मदत होणार आहे.

कृषी महाविद्यालय, मूल चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही.जी. अतकरे यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. आर.पी.गजभिये ,कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष लाडे, व सोनापुर,गडचिरोली येथील कृषी संशोधन केंद्र ,प्रभारी डॉ.गणवीर व विषय तज्ञ डॉ एस.बी वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

सदर कार्यक्रमास मुल येथील कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वयम जाथडे, चेतन कापगते व रोहित राऊत व बँक अधिकारी अनिल श्रीरामे आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!