Thursday, August 20, 2026
Homeसाईबाबा मंदिरवॉर्ड न. 1 मधील साईबाबा मंदिर सभागृहाचे बांधकाम तात्काळ सुरू करावे; 
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

वॉर्ड न. 1 मधील साईबाबा मंदिर सभागृहाचे बांधकाम तात्काळ सुरू करावे;

image_pdfimage_print

मूल  ( मेहुल मनियार )

    मूल शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील साईबाबा मंदिर परिसरात साईभक्त व स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून साईबाबा मंदिर सभागृहाच्या बांधकामासाठी अंदाजे ₹१ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सदर कामाची वर्क ऑर्डर होऊन जवळपास आठ महिने उलटले, तरीही प्रत्यक्ष बांधकामाला अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे साईभक्त व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

साईबाबा मंदिर परिसरात विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात असल्याने सभागृहाची अत्यंत गरज आहे. त्यामुळे संबंधित विभागाने कोणताही विलंब न करता तातडीने बांधकाम सुरू करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.भाजपा शहराध्यक्ष प्रविण मोहुर्ले यांच्या नेतृत्वात भाजपा ज्येष्ठ नेते मोतीलाल टहलियानी, जिल्हा कार्यक्रम प्रमुख सौ.प्रा. किरण कापगते,जिल्हा अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष श्री.मिलिंद खोब्रागडे,माजी नगराध्यक्ष उषा शेंडे,नगर सेविका सौ अश्विनी निकोडे,नगर सेविका सौ.प्राची आक्केवार ,महामंत्री प्रशांत बोबाटे,प्रा.सुधीर नागोशे,युवा उपाध्यक्ष सूरज मान्दाळे, किसान आघाडी प्रमुख विवेक मान्दाळे,सामाजिक कार्यकर्ता राकेश मोहुर्ले,रुपेश निकोडे,सौ.पूजा रामटेके यांच्या सह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते.

प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन काम सुरू न केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

 

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!