_गंध
सांजवेळी कुजबुज पडली कानी पारव्याची !
हळूच झुळूक अंग स्पर्शून गेली गारव्याची !!
अलगद नभातुनी बरसु लागल्या भुईवर सरी !
मुखावर माझ्या हर्ष लाट अन धडधड पेटली उरी !!
सुटले मन मोकाट ना कुठलाही मनाला बांध !
फुलपाखरासंगे उडत आला तुझ्या आठवणींचा गंध !!
आठवणींच्या हिंदोळ्यावर मन उंच उंच झोके घेई !
तुझ्या गंधात बांधूनी मज विशाल गगनात नेई !!
_ मुक्ता आगडे pk
मूल, चंद्रपूर