Sunday, June 21, 2026
Homeबीज प्रक्रियामुल येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बियाणे प्रक्रिया बद्दल शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मुल येथील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बियाणे प्रक्रिया बद्दल शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

 पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित मूल येथील कृषी महाविद्यालयाच्या कन्यांनी मारोडा येथे 17 जून 2026 ला ग्रामीण कृषी कार्यानुभव ( RAWE ) या उपक्रमा अंतर्गत  रमेश मुरस्कार आणि इतर शेतकऱ्यांना बियाणे प्रक्रिया त्याचप्रमाणे निरोगी पिकासाठी कोणत्या प्रकारचा उपाय करावा याबाबत मार्गदर्शन केले

बियाणे प्रक्रिया : निरोगी पिकासाठी प्रभावी उपाय

    कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,पेरणीपूर्वी बियाण्यावर बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्याने बियाणे व जमिनीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून पिकाचे संरक्षण होते. ट्रायकोडर्मासारख्या जैविक बुरशीनाशकाच्या वापरामुळे बियाण्याची उगवण क्षमता सुधारते, रोपांची सुरुवातीची वाढ चांगली होते आणि पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.

   या उपक्रमात महाविद्यालयाच्या कृषी कन्या कु. राधिका डोंगरवार, कु. संस्कृती इटकलवार,कु. स्वानंदी गाडगे कु. दृष्टी गायकवाड यांनी मारोडा येथील शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले.

 

    त्यांनी पुढे सांगितले की,या प्रक्रियेमुळे पिकाची सुरुवात मजबूत होते व रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात निरोगी पीक व्यवस्थापन करता येते.

शेतकऱ्यांचा प्रतिसाद :
बियाणे प्रक्रिया केल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. उगवण चांगली झाली असून रोपांची वाढ निरोगी दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाबद्दल समाधान व्यक्त केले.

      कृषी महाविद्यालय, मूल चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जे. अतकरे यांच्या प्रेरणेतून या प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक डॉ. आर. पी. गजभिये, डॉ. एस. आर. मुन्नरवार, डॉ. ए. जे. इंगोले, कार्यक्रम अधिकारी प्रा. नागेश नवघरे यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच हा कार्यक्रम उत्तमरीत्या संपन्न झाला.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!