Thursday, August 20, 2026
Homeआर्थिक सहायताअस्वलीच्या हल्ल्यात जखमी सुरेश कुणघाडकर ला आर्थिक मदतीचा आधार
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

अस्वलीच्या हल्ल्यात जखमी सुरेश कुणघाडकर ला आर्थिक मदतीचा आधार

image_pdfimage_print

ग्राम.पंचायत सदस्य प्रशांत गट्टुवार व गणेश दुधबळे तथा ग्रामवासियानी केली आर्थिक मदतीची मागणी..!

मूल
मूल तालुक्यातील चिचाळा येथे १७/१२/२०२५ च्या मध्य रात्री अस्वलीने गावात शिरून हैदोस घालत गुराखी सुरेश काशीनाथ कुणघाडकर यांचे वर हल्ला चढवून गंभीर जखमी केले. सुरेश कुनघाडकर यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून त्यांचेवर नागपूर येथील मेडिकल कॉलेज रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.

      ही बाब आमदार सुधीर मुनगंटीवार याना ग्रामस्थानी उथळपेठ येथे कार्यक्रमात निवेदन द्वारा दिली. सुधीर मुनगंटीवार यांनी लगेच वनविभाग यांचेशी संपर्क साधून ५ लाख रु. मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले व स्वतः कडून ही मदत देणार असे जाहीर पणे सांगितले.यावेळी उथळपेठ चे सरपंच पालिंदर सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.

निवेदन देताना ग्रा.पंचायत सदस्य प्रशांत गट्टुवार,गणेश दुधबळे,सुनील दुधबळें,विजय ढोडरे,वासुदेव बुरांडे,टिकू दुधे,साईनाथ दुधबळे,मनोहर बुरांडे,प्रकाश कुनघाडकर उपस्थित होते.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!