Wednesday, October 21, 2026
Homeनिवेदनचांदा फोर्ट ते जबलपूर जाणाऱ्या एक्सप्रेस गाडीचा मुल मारोडा रेल्वे स्टेशन वर...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

चांदा फोर्ट ते जबलपूर जाणाऱ्या एक्सप्रेस गाडीचा मुल मारोडा रेल्वे स्टेशन वर थांबा देण्याची मागणी

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

चांदा फोर्ट ते जबलपूर ( 22173) साठी दर मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार ला मूल वरून एक्सप्रेस गाडी धावत आहे. पण या गाडीचा मुल मरोडा रेल्वे स्टेशनवर थांबा नसल्यामुळे येथील माजी नगर सेवक,  मुल जनरल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते मोतीलाल टहलीयानी  यांनी रेल्वेमंत्री यांच्याकडे मागणी पत्र पाठविले आहे. त्याच प्रमाणे परतीच्या (22174) एक्सप्रेस गाडी चा सुद्धा मुल मरोरा रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी केली आहे.
रेल्वे मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे की, या परिसरातील नागरिक व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि प्रशासकीय कामांसाठी वारंवार गोंदिया, जबलपूर आणि मध्य प्रदेशातील इतर शहरांमध्ये प्रवास करतात.
चांदा फोर्ट ते जबलपूर एक्सप्रेस ही या मार्गावरील एक महत्त्वाची सेवा आहे, परंतु दुर्दैवाने, ती मूल मारोडा रेल्वे स्थानकावर थांबत नाही. परिणामी, मूल स्थानकावरील आणि आसपासच्या ग्रामीण भागातील प्रवाशांना या ट्रेनचा लाभ घेता येत नाही.
सामान्यपणे या एक्सप्रेसचा थांबा नसल्यामुळे या भागातील लोकांना बऱ्याच अडचणी येतात.
मूलमरोडा रेल्वे स्टेशन हा एक वर्दळीचा परिसर असून, येथून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात, त्यांना आवश्यक त्या वेळी ट्रेन पकडण्यासाठी चांदा फोर्ट किंवा इतर दूरच्या स्टेशनवर जावे लागते. वृद्ध व्यक्ती, महिला आणि विद्यार्थ्यांना प्रवासात प्रचंड गैरसोय आणि अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागतो. तसेच या भागातील व्यापारी आणि कामगार वर्गाचा वेळ विनाकारण वाया जातो.
चांदा फोर्टहून सुटणाऱ्या या ट्रेनमध्ये मूल मरोडा हे एक मोठे स्टेशन आहे. तसें पाहता या ट्रेन मध्ये प्रवाशांची संख्या फार कमी असते. जर या स्टेशनवर थांबा दिल्यास रेल्वे प्रशासनाचे उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकते.
म्हणूनच चांदा फोर्ट-जबलपूर एक्सप्रेस ट्रेनला मुलमरोडा स्टेशनवर किमान दोन मिनिटांचा प्रायोगिक थांबा द्यावा. या मागणीच्या प्रती माजी मंत्री व विद्यमान आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार तसेच रेल्वे मंडल प्रबंधक यांना पाठविल्या आहेत. रेल्वे प्रशासन या मागणीचा विचार करून मुल आणि आजूबाजूच्या क्षेत्रातील प्रवाशांची मागणी पूर्ण करेल ही अपेक्षा केली जाते.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!