Saturday, June 6, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025प्रशांत नावात महासागर तसेच एकता समर्थांच्या पाठीशी जनसागर!

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

प्रशांत नावात महासागर तसेच एकता समर्थांच्या पाठीशी जनसागर!

मूल

नगर परिषद निवडणूक 2025 साठी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या सौं. एकता प्रशांत समर्थ यांना जनतेचा वाढता प्रतिसाद मिळत असून शहरातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदलताना दिसत आहे. त्यांच्या प्रचाराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रत्येक वॉर्डात वाढणारी गर्दी व नागरिकांचा विश्वास पाहता त्या नगराध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार ठरत असल्याची चर्चा सुरू आहे.

विशेष म्हणजे, माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी सपत्नीक शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.आपल्या कार्यक्षम नेतृत्वामुळे, विकासाभिमुख कामांमुळे व जनसंपर्कामुळे त्यांनी अल्पावधीतच जनतेत मजबूत स्थान निर्माण केले आहे. आज त्यांची राजकीय ताकद इतकी वाढली आहे की ते थेट क्षेत्राच्या आमदारांना टक्कर देत आहेत, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. इतकेच नव्हे तर आमदारांनाही त्यांच्याविरोधात लढण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावावी लागत आहे, हेच दर्शवते की प्रशांत समर्थ यांचे वजन किती वाढले आहे.

काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या वेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सौं. एकता समर्थ यांच्या उमेदवारीची घोषणा करत “मूल नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी एकजुटीने लढा” असे आवाहन केले होते. त्याला मिळणारा प्रतिसाद आज प्रत्यक्ष मैदानात दिसून येत आहे.

दुसरीकडे भाजपकडून शेवटच्या क्षणी डॉ. प्रा. किरण किशोर कापगते यांची उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारीसाठी अनेक निष्ठावंत इच्छुक असताना निर्माण झालेली नाराजी दूर करत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन केले असले तरी मैदानात काँग्रेसची बाजू अधिक भक्कम दिसत आहे.

2016 मध्ये मूल नगर परिषदेवर भाजपची सत्ता होती.मात्र यावेळी चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकता समर्थ यांना मिळणारा वाढता पाठींबा, प्रशांत समर्थ यांची लोकप्रियता आणि काँग्रेसमधील वाढती ऊर्जा पाहता सध्याच्या घडीला नगराध्यक्षपदाची बाजू काँग्रेसकडे झुकताना स्पष्ट दिसत आहे.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!