Wednesday, October 21, 2026
Homeगॅस सिलेंडर समस्यागॅस सिलेंडर घरपोच मिळत नसल्याने गॅस धारकांना होत आहे त्रास.
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

गॅस सिलेंडर घरपोच मिळत नसल्याने गॅस धारकांना होत आहे त्रास.

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

सध्याच्या परिस्थितीत गॅस सिलेंडरची कमतरता असल्यामुळे नागरिकांना गॅस सिलेंडर उपलब्ध होण्यासाठी त्रास होत आहे. मुल येथील गॅस एजन्सी बंद झाल्यामुळे सावली येथील गॅस एजन्सी द्वारे मूल च्या गॅसधारकांना सिलेंडर पुरवठा होत आहे.ज्या गॅसधारकांनी सिलेंडरचे बुकिंग केलेले आहे त्यांना गॅस वितरण केले जात आहे. सावली येथील गॅस कंपनीचे संचालक यांनी सांगितले की, गॅस सिलेंडर बुक केलेल्या सर्व गॅसधारकांना ओटीपी द्वारे गॅस सिलेंडरचे वितरण होत आहे. गॅस सिलेंडरचा घरपोच पुरवठा केला जाईल अशा प्रकारची सूचना असताना सुद्धा शहरातील वेगवेगळ्या भागात गॅस सिलेंडर पुरवठा करण्याच्या कार्यामुळे नागरिकांना फार त्रास होत आहे. भर उन्हामध्ये नागरिक गॅस सिलेंडर साठी ताटकळत उभे राहतात, असे दृश्य दिसून येत आहे. वयोवृद्ध नागरिकांना या प्रकारे उन्हात ताटकळत उभे राहणे शक्य आहे काय याचा गॅस एजन्सी संचालकांनी विचार करायला पाहिजे. घरपोच गॅस सिलेंडर दिल्यास नागरिकांना हा त्रास होणार नाही हे मात्र निश्चित. गॅस एजन्सीच्या संचालकांनी याबाबत योग्य निर्णय घेऊन घरपोच गॅस सिलेंडर पोहचविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!