Tuesday, October 20, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025मुल नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रभाग ५ मध्ये तरुण नेतृत्वाचा उदय! ऋतिक...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मुल नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रभाग ५ मध्ये तरुण नेतृत्वाचा उदय! ऋतिक गोयल काँग्रेसकडून मैदानात

image_pdfimage_print

मूल

आगामी नगरपरिषद निवडणुकांची तयारी जोरात सुरू असताना शहरातील प्रतिष्ठित गोयल परिवारातील शिक्षित, अभ्यासू व समाजाभिमुख तरुण ऋतिक दिनेश गोयल यांनी प्रभाग क्रमांक ५ मधून काँग्रेसकडून उमेदवारीची जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वशैली व कार्यप्रणालीतून प्रेरणा घेत त्यांनी राजकारणात पहिली पायरी टाकली आहे.

लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड जपलेल्या ऋतिक गोयल यांचा सर्वसामान्यांशी सतत संपर्क राहिला असून नागरिकांच्या समस्या, त्यांची गरज आणि विकासाभिमुख अपेक्षा यांचा त्यांनी जवळून अभ्यास केला आहे. जनतेची सेवा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःचे आयुष्य समर्पित करण्याचा माझा संकल्प आहे,अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

शहरात तरुण व समाजाभिमुख उमेदवार म्हणून ऋतिक गोयल यांच्या निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून विशेषत: युवकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबद्दल उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

आजच्या आधुनिक काळात अनेक तरुण आरामशीर जीवनशैली स्वीकारतात, मात्र जनतेच्या अडचणी समाधानासाठी पुढाकार घेणाऱ्या ऋतिक गोयल यांच्या राजकारणातील पहिल्या विजयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्थानिकांचा विश्वास आहे की, प्रभाग ५ मध्ये काँग्रेसकडून नव्या ऊर्जा, ताज्या विचारांची व सकारात्मक बदलाची चिन्हे दाखवणारी ही उमेदवारी आगामी निवडणुकीत नक्कीच विजय प्राप्त करेल.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!