Friday, June 5, 2026
Homeमृदा परीक्षणकृषी महाविद्यालय मुलच्या कृषि कन्या तर्फे लोणवाही येथे मृदा नमुना संकलन अभियान...

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कृषी महाविद्यालय मुलच्या कृषि कन्या तर्फे लोणवाही येथे मृदा नमुना संकलन अभियान संपन्न

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

        पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित  कृषी महाविद्यालय, मूल च्या ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत कृषी कन्यां द्वारा रावे (RAWE) विद्यार्थीनीनी मृदा नमुना संकलन चे प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही येथे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना मृदा परीक्षणाचे महत्त्व पटवून देणे तसेच संतुलित खत व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.

    कृषी महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जे.अतकरे यांच्या प्रेरणेने प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. आर.पी. गजभिये , कृषी विज्ञान केंद्र, शिंदेवाही येथिल वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. सोनाली दुपटे, रावे प्रभारी डॉ. देशपांडे आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविणा बरडे व मृदा विज्ञान विषयतज्ञ डॉ. विशाखा डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
या उपक्रमात रावे विद्यार्थीनी करुणा साहू, महारुख शेख, मोहिनी तिखट, पल्लवी उरकुडे आणि श्रद्धा वालोडे यांनी लोणवाही येथील शेतकऱ्यांच्या शेतांमधून मृदा नमुने संकलित केले. तसेच मातीचे नमुने योग्य पद्धतीने कसे घ्यावेत, मृदा परीक्षणासाठी नमुने कसे तयार करावेत आणि मृदा आरोग्य पत्रिकेचा उपयोग कसा करावा याबाबत चे मार्गदर्शन कृषी कन्या द्वारें करण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांना जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, सामू (pH), सेंद्रिय कर्ब तसेच इतर आवश्यक घटकांची माहिती मृदा परीक्षणाद्वारे मिळू शकते, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. मृदा परीक्षणाच्या आधारे संतुलित खत व्यवस्थापन केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन पीक उत्पादन व गुणवत्ता वाढण्यास मदत होते, असे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व मृदा परीक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. हा उपक्रम शाश्वत शेती व मृदा आरोग्य संवर्धनासाठी उपयुक्त ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!