Thursday, October 22, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025मूल नगरपरिषद निवडणूक 2025:"जनतेसाठी सदैव उपलब्ध" – ऋतिक गोयल प्रभागाच्या उज्वल भविष्यासाठी...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल नगरपरिषद निवडणूक 2025:”जनतेसाठी सदैव उपलब्ध” – ऋतिक गोयल प्रभागाच्या उज्वल भविष्यासाठी पुढे

image_pdfimage_print

मूल

मूल नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शहरातील तरुण, सुशिक्षित आणि कार्यक्षम व्यक्तिमत्त्व म्हणून ऋतिक दिनेश गोयल यांची चर्चा वाढत आहे. गोयल कुटुंबाची ओळखच सामाजिक कार्य, संस्कार आणि सर्वांसाठी उपलब्ध राहण्याच्या वृत्तीने भरलेली आहे. एकत्र कुटुंब व्यवस्था (जॉईंट फॅमिली) असल्याने लहानपणापासूनच ऋतिक यांच्या मनात समाजाभिमुखतेची बीजे रोवली गेली आहेत.

ऋतिक गोयल हे JCI या प्रतिष्ठित सामाजिक संस्थेशी जुळलेले असल्याने त्यांना समाजातील प्रत्येक स्तरातील समस्यांचा जवळून परिचय झाला. सामान्य नागरिकांच्या अडचणी, गरजा आणि अपेक्षा समजून घेऊन त्यावर नवे समाधान शोधण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.

प्रभागातील नागरिकांना “नेहमी उपलब्ध राहणे” हा त्यांचा स्पष्ट प्रण आहे. प्रत्येक व्यक्तीची समस्या ऐकून तात्काळ उपाययोजना करणे, हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य ठरणार आहे.

निवडणुकीत संधी मिळाल्यास—

प्रभागाला ‘स्मार्ट वॉर्ड’ बनवणे

नव्या कल्पना आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित मुल घडवणे

युवकांसाठी दिशा, महिलांसाठी सुविधा आणि ज्येष्ठांसाठी सुरक्षित वातावरण देणे

स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवांमध्ये गुणवत्ता वाढवणे.

सामान्य लोकांसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करण्याचा हृतिक गोयल यांचा ध्यास पाहता, तरुण नेतृत्व शोधणाऱ्या मतदारांमध्ये त्यांच्या नावाबद्दल उत्सुकता वाढताना दिसत आहे.

मूल शहराला नवी दिशा देण्याच्या संकल्पासह ऋतिक दिनेश गोयल आता निवडणूक रणांगणात सज्ज झाले आहेत.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!