Saturday, August 22, 2026
Homeशैक्षणिक भेटकर्मवीर महाविद्यालय, मूल च्या रेड रिबन क्लबतर्फे उपजिल्हा रुग्णालयाच्या ICTC...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कर्मवीर महाविद्यालय, मूल च्या रेड रिबन क्लबतर्फे उपजिल्हा रुग्णालयाच्या ICTC विभागाला शैक्षणिक भेट

image_pdfimage_print

मूल : ( मेहुल मनियार )

      कर्मवीर महाविद्यालय, मूल येथील रेड रिबन क्लबच्या वतीने ICTC (Integrated Counselling and Testing Centre) उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे शैक्षणिक व जनजागृतीपर भेट देण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली व रेड रिबन क्लबचे प्रमुख प्रा. प्रवीण उपरे यांच्या नेतृत्वात स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या भेटीदरम्यान ICTC केंद्रातील समुपदेशक श्रीमती मीना नंदनवार यांनी विद्यार्थ्यांना HIV/AIDS विषयी सविस्तर माहिती दिली. HIV विषाणूचा प्रसार कशा प्रकारे होतो, त्याची लक्षणे कोणती, तपासणीची प्रक्रिया कशी असते, तसेच वेळेवर निदान व उपचाराचे महत्त्व काय आहे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. HIV संदर्भातील गैरसमज व अफवा दूर करून वैज्ञानिक दृष्टीकोनातून जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.


तसेच NCD विभागाच्या ममता शेंडे यांनी HIV बाधित व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या समुपदेशन प्रक्रियेबाबत माहिती दिली. रुग्णांची गोपनीयता राखणे, मानसिक आधार देणे, सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळवून देणे या बाबी समुपदेशनात किती महत्त्वाच्या असतात हे त्यांनी स्पष्ट केले. HIV ग्रस्त व्यक्ती समाजाचा एक भाग असून त्यांच्याशी भेदभाव न करता संवेदनशीलतेने वागणे ही समाजाची जबाबदारी आहे, असा संदेश त्यांनी दिला.
विद्यार्थ्यांनी ICTC केंद्रातील तपासणी कक्ष, समुपदेशन कक्ष व कार्यपद्धती प्रत्यक्ष पाहिली. या प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांमध्ये HIV विषयी जागरूकता वाढण्यासोबतच सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक दृढ झाली. रेड रिबन क्लबच्या माध्यमातून महाविद्यालयात नियमितपणे जनजागृती उपक्रम राबविले जातात, त्याचाच एक भाग म्हणून ही भेट आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राचार्या डॉ. अनिता वाळके यांनी समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक सामाजिक प्रश्नांबाबत सजग राहावे, असे आवाहन केले. प्रा. प्रवीण उपरे यांनी ICTC केंद्रातील अधिकाऱ्यांचे आभार मानत भविष्यातही अशा शैक्षणिक भेटी आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये HIV/AIDS संदर्भात जागरूकता निर्माण होऊन समाजामध्ये सकारात्मक संदेश पोहोचण्यास निश्चितच मदत होणार आहे.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!