Friday, August 21, 2026
Home10 वी परिक्षा परिणाममुल येथील माऊंट कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज चा दहावीचा परीक्षा निकाल शंभर...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मुल येथील माऊंट कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज चा दहावीचा परीक्षा निकाल शंभर टक्के

image_pdfimage_print

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

 महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल घोषित झाला. दिशा फाउंडेशन संचलित मूल येथील माऊंट कॉन्व्हेंट अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स चा इयत्ता दहावीचा १०० टक्के निकाल लागला असून यशाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विद्यालयातून वेदांग तुफान अनंततुलवार याने ९४.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच तन्वी सुधाकर भुरसे हिने ९४.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. तर श्रेया दत्तू गोंगले हिने ९४.०० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक संपादन केला.

      याशिवाय विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट यश संपादन करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या शाळेची विद्यार्थिनी कु. पूर्वा विवेक मोहुर्ले हिने विज्ञान विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत विशेष प्राविण्य संपादन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका, वर्गशिक्षक, विषय शिक्षक तसेच पालकांना दिले. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष भाऊराव झाडे, मुख्याध्यापिका रीमा कांबळे, वर्गशिक्षक अशफाक सय्यद , कनिष्ठ महाविद्यालय प्रभारी दुष्यंत गणवीर  तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

 विद्यालयाच्या या अभिमानास्पद यशामुळे पंचक्रोशीत सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. 🌸🌸

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!