Sunday, April 19, 2026
Homeजागतिक महिला दिवसआजच्या काळात महिला सुरक्षित नाही

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

आजच्या काळात महिला सुरक्षित नाही

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )
दरवर्षी जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या हक्क, सन्मान, संघर्ष आणि यशाला समर्पित आहे. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांनी दिलेल्या योगदानाची जाणीव करून देणे हे यामागील मुख्य उद्दिष्ट आहे.
महिलांचे शिक्षण, आरोग्य, रोजगार, राजकारण अशा सर्व क्षेत्रांत महिलांना समान संधी मिळाव्यात यासाठी जागृती, स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत भेदभावाविरुद्ध आवाज उठवणे, महिलांनी आपल्या हक्कांसाठी केलेल्या लढ्याची आठवण आणि त्यातून मिळालेल्या यशाचा गौरव करणे हा आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया च्या मुल शाखेत कार्यरत असलेल्या कु. प्रीती कोमरेल्लीवार यांनी सांगितले की, जागतिक पातळीवर महिलाचा सन्मान आणि त्यांचे हक्क दर्शविण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो.
मुलगी एकदा जन्माला आली तेव्हापासून तिचा संघर्ष सुरू होतो. शिक्षण, तिची आवड, तिच्या सवयी सगड हे तिच्या नसून तिला फक्त दूसऱ्याच्या मनानुसार कराव्या लागतात. तिचं हसणं, बोलण, वावरण अश्या प्रत्येक गोष्टीत तिला स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा अधिक विचार करावा लागतो. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी ती विचार काय करते याचा कोणीही विचार करत नाही. मग काय तेच, कोणी काय विचार करेल या मुळेच ती आपले विचार मनातच ठेवते.
काही लोक असा विचार करतात की मुलगी शिकली तर तिची जागा फक्त चुल आणि मुल एवढीच. पण ते कधी हा विचार नाही करत की आज सगळ्याच क्षेत्रात महिलाच अव्वल आहेत.
समाजात वावरताना तिला प्रत्येक अडचणीला सामोरे जावे लागते कारण ती फक्त मुलगी आहे म्हणून, पण विचार जर बदलले तर महिला सर्व काही करू शकतात, त्यांना फक्त गरज आहे ती पाठिंब्याची.
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न विचारात घेतला तर समाज ज्या नजरेने एका मुलांचा विचार करतात, जो सन्मान, आदर त्यांना मिळतो, त्याच प्रकारचा सन्मान महिलांना पण मिळाला तर कोणतीही महिला असुरक्षित राहणार नाही .
कर्मवीर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रुनाली जेंगठे ने सांगितले की
माझ्या मते आजच्या काळात महिला आणि मुली पूर्णपणे सुरक्षित नाही आहे. कायदे आहेत, घोषणा आहेत… पण मानसिकता अजूनही बदललेली नाही. भाषण, कार्यक्रम, पोस्टर्स यांमधून महिलांचे कौतुक केले जाते. महिला दिन हा एक दिवसापुरता मयादित न राहाता तो विचार बनायला हवा. कारण महिला रोजच्या आयुष्यात अनेक जबाबदाऱ्या सांभाळतात. घर, शिक्षण, नोकरी, समाज अशा सर्व ठिकाणी त्या स्वतःला सिद्ध करत असतात. सुरक्षिततेचा प्रश्न हा फक्त कायद्यापुरता मर्यादित नसून तो मानसिकतेशी जोडलेला आहे.
घरा बाहेर एकटी जाताना, बाहेरचं जग पाहाताना कीती Uncomfortable वाटते हे फक्त मुलींनाचं माहीत आहे. घराबाहेर पडताना जनावराची नाही पण मनुष्याची भीती वाटते. कायदे, नियम आणि शिक्षांचा उपयोग तेव्हाच होतो, जेव्हा समाजाची विचारसरणी बदलते. महिलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही अनेक ठीकाणी जुनाट आहे. दोषी व्यक्तीऐवजी महिलेलाचं प्रश्न विचारले जातात. महिलांच्या कपड्यांवरुन, वागण्या वरुन तिच्या स्वातंत्र्यावर बंधनं घातली जातात. महिला कमजोर नाहित, पण त्यांना वारंवार स्वतःची ताकद सिद्ध करावी लागते. महिला दिन साजरा करताना फक्त शुभेच्छा देणं पुरेसं नाही. महिलांचा सम्मान हा रोजच्या वागण्यातून दिसायला हवा. मुलींना आत्मविश्वास देणं, त्यांचं ऐकून घेणं आणि त्यांना
निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देणं हे फार महत्त्वाचं आहे. शिक्षण आणि योग्य संस्कारांमधूनच खरा बदल घडू शकतो.
महिला दिन तेव्हाच साजरा झाल्यासारखा वाटेल, जेव्हा ती ३६५ दिवस सुरक्षित, सन्मानाने आणि स्वातंत्र्याने जगू शकेल.
कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. नेहा भोयर हिने सांगितले की दारूबंदी, स्त्रीभ्रूणहत्या आणि हुंडा यासारख्या समस्यांमुळे समाजात महिलांचे शोषण सुरूच आहे. महिलांना समाजाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो, जेव्हा राष्ट्र उभारणीत महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात सहभागी आहेत, तरी सुद्धा त्यांना हवा तितका सन्मान मिळत नाही असे वाटते.

देवनील कॉलेज ऑफ नर्सिंग (आकापूर) ची विद्यार्थिनी कु.सानिया गलबले हिने सांगितले की,महिला सबलीकरण म्हणजे महिलांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात समान हक्क व संधी देणे होय. महिलांना स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, त्यांना प्रत्येक गोष्टीचा अधिकार देणे म्हणजेच महिला सशक्तीकरण होय. स्त्री म्हणजे समाजाचा पाया असतो. तिच्याशिवाय समाज हा अपुरा असतो. स्त्रीने वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नावलौकीक मिळविले आहे. आजच्या युगात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यात कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. समाजाला दिशा आणि स्त्रियांना शिकण्याची संधी मिळवून देणाऱ्या सावित्री बाई फुले, भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी,यांचा आवर्जून उल्लेख केला जातो.

कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी भावना चरपे हिने म्हटले की, भारतात अनेक महिला स्वातंत्र्य सेनानी झाल्या. मृत्युच्या मैदानात लढणाऱ्या राणी लक्ष्मी बाई, सरोजिनी नायडू, महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटिल, अख्या जगाची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मदर टेरेसा परंतू एवढ्‌या कर्तृत्चवान महिलांचा इतिहास साक्षी आहे.

या देशात स्त्रीला देवाचा दर्जा तर मिळत नाहीच पण साधा माणुसकीचा दर्जा ही नाहीत याची खंत आहे. ज्या देशात कल्पना चावला, सुनिता विल्यम सारख्या स्त्रीया ग्रह ताऱ्यांपर्यंत पोहोचु शकतात त्याच देशात स्त्री म्हणजे ग्रहदशा असं म्हणण्याचं कारण नेमक काय? मला तर वाटत गरज आहे त्या स्त्रीच्या सन्मानाची.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!