Wednesday, October 21, 2026
Homeसिकलसेल शिबीरनवभारत विद्यालय मुल येथे सिकलसेल ॲनिमिया विशेष तपासणी शिबिर संपन्न
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

नवभारत विद्यालय मुल येथे सिकलसेल ॲनिमिया विशेष तपासणी शिबिर संपन्न

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

 नवभारत विद्यालय मुल येथे 20 जानेवारी ला सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानांतर्गत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक झाडे  होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सोनटक्के, डॉ. वरपल्लीवार, डॉ. जटाले उपस्थित होते. आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर डॉ. सोनटक्के आणि डॉ. वरपल्लीवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मिशन राज्यातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ सह 21 जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान 15 जानेवारी ते 7 फरवरी 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्यामध्ये 0 ते 40 वयोगटातील सर्व व्यक्तींची सिकलसेल करिता तपासणी व गरजेनुसार औषध उपचार करण्यात येणार आहे.
सदर मोहिमेत सक्रिय सहभाग होऊन नवभारत विद्यालय मुल येथील विद्यार्थ्यांनी सिकलसेल तपासणी, उपचार व समुपदेशन करण्यात आले. आरोग्य विभागातील परिचारिका यांनी विशेष अभियान यशस्वी होण्यासाठी पुढाकार घेतला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक झाडे, पर्यवेक्षिका सौ वर्षा भांडारकर, विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक गुरुदास चौधरी , विकास मोडक,निलेश माथनकर, राजू बोढे, पुनमचंद वाळके, कु.माधुरी तलांडे, कु.दिपा गोंगल तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. वर्ग 9 वी चे सर्व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी राहुल नागापूरे, मनिषा मडावी, संगीता टांगले यांनी अथक परिश्रम घेतले.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!