Thursday, August 20, 2026
Homeमार्गदर्शन कार्यक्रमकिशोरवयीन मुलींसाठी लैंगिक शिक्षण ही सशक्त आणि सुरक्षित समाजनिर्मितीची गुरुकिल्ली – चंद्रकांत...
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

किशोरवयीन मुलींसाठी लैंगिक शिक्षण ही सशक्त आणि सुरक्षित समाजनिर्मितीची गुरुकिल्ली – चंद्रकांत मणियार

image_pdfimage_print

प्रा. चंद्रकांत मनियार यांनी विद्यार्थिनीना केले मार्गदर्शन

मुल  ( मेहुल मनियार )

       कृषि महाविद्यालय, मुल येथे गुरुवार, दि. १६ जुलै २०२६ रोजी विद्यार्थिनींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता, आत्मविश्वास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने “किशोरवयीन मुलींसाठी लैंगिक शिक्षणाचे महत्त्व” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात वरिष्ठ पत्रकार तथा माजी प्राध्यापक चंद्रकांत मणियार यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे होते व महाविद्यालयाचे उद्यानविद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. आर. पी. गजभिये यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाच्या उद्देशाविषयी माहिती देताना विद्यार्थिनींना लैंगिक शिक्षणासंबंधी योग्य, वैज्ञानिक आणि वस्तुनिष्ठ माहिती मिळणे ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज असल्याचे सांगण्यात आले.

      कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. चंद्रकांत मणियार यांनी आपल्या प्रभावी व्याख्यानातून किशोरवयीन मुलींमध्ये होणारे शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल, त्यांची शास्त्रीय कारणे तसेच या बदलांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची आवश्यकता स्पष्ट केली. ते म्हणाले की, लैंगिक शिक्षण म्हणजे केवळ प्रजननाविषयी माहिती नसून स्वतःच्या शरीराची ओळख, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्यदायी जीवनशैली, भावनिक परिपक्वता, परस्पर सन्मान, सुरक्षित वर्तन आणि जबाबदार निर्णयक्षमता यांचा समावेश असलेली व्यापक संकल्पना आहे. समाजात या विषयाबाबत अनेक गैरसमज आणि संकोच असल्यामुळे किशोरवयीन मुलींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पालक, शिक्षक आणि समाजाने खुल्या संवादातून योग्य माहिती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी विद्यार्थिनींना सायबर माध्यमांवरील वाढते धोके, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, वैयक्तिक गोपनीयतेचे संरक्षण आणि कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळ अथवा अत्याचाराच्या प्रसंगी तातडीने विश्वासू व्यक्ती किंवा संबंधित यंत्रणांशी संपर्क साधण्याचे महत्त्वही अधोरेखित केले. आत्मविश्वास, स्वाभिमान आणि योग्य माहिती यांच्या बळावर प्रत्येक मुलगी स्वतःचे संरक्षण करू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

     महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास घडविणे हे महाविद्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. अशा विषयांवरील व्याख्याने विद्यार्थिनींमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, आरोग्याविषयी जागरूकता आणि आत्मविश्वास निर्माण करण्यास उपयुक्त ठरतात, असे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थिनींनी अशा कार्यक्रमांतून मिळणाऱ्या ज्ञानाचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करून निरोगी, सुरक्षित आणि जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहनही त्यांनी केले.

  •           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. गितांशु डिंकवार यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थिनींचे आभार मानले. या व्याख्यानाला महाविद्यालयातील तृतीय, पाचव्या आणि सातव्या सत्रातील सर्व विद्यार्थिनी व प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!