Thursday, August 20, 2026
Homeवृक्षारोपण कार्यक्रममुल येथील एस. टी. बस स्थानकावर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन
Breaking News

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मुल येथील एस. टी. बस स्थानकावर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

image_pdfimage_print

मूल ( मेहुल मनियार )

एसटी महामंडळाच्या 78 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने मुल येथील बस स्थानकावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

राज्यातील बस स्थानके, आगार, विभागीय कार्यालय अशा जवळपास 1000 ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. एस. टी.महामंडळातर्फे पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.


या कार्यक्रमात चंद्रपूर येथील विभागीय वाहतूक अधीक्षक प्रांजली थोटे, मूल नगर परिषदेचे बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, नगरसेवक गुलाबखां पठाण, लोकमत समाचार चे पत्रकार चंद्रकांत मणियार, जागृत ग्राहक राजाचे अध्यक्ष दीपक देशपांडे, येथील वाहतूक नियंत्रक इलियास शेख, विभावरी बोथले, एन डी पठाण आदी गणमान्य उपस्थित होते.

image_print
Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!