Sunday, April 19, 2026
Homeमार्गदर्शन कार्यक्रमMPSC एम.पी.एस.सी. (कृषी) परीक्षेकरिता दिशादर्शक मार्गदर्शन

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

MPSC एम.पी.एस.सी. (कृषी) परीक्षेकरिता दिशादर्शक मार्गदर्शन

 कृषि महाविद्यालय, मुल येथे व्याख्यानाचे आयोजन

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )
पंजाबराव कृषी विद्यापीठ संलग्नित कृषि महाविद्यालय, मुल येथे दिनांक २८ मार्च, २०२६ रोजी आयोजित “महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी विभागासाठी परीक्षेची तयारी” या विषयावर प्लेसमेंट सेल व स्पर्धा परीक्षा मंच अंतर्गत व्याख्यानाच्या शृंखलेत हे आठवे अतिथी व्याख्यान  आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून  धानोरा येथील मंडळ कृषि अधिकारी,मा. पवन सुरेश मडावी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे तसेच डॉ. आर. पी. गजभिये, प्राध्यापक (उद्यानविद्या) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची प्रस्तावना सहायक प्राध्यापक नागेश नवघरे (मृद विज्ञान) यांनी केली
कार्यक्रमास उपस्थित श्री. पवन मडावी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेची संपूर्ण रचना, अभ्यासक्रमाचे बारकावे आणि गुण मिळविण्याच्या प्रभावी पद्धती यांचे सविस्तर विश्लेषण केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रिलिम्स व मेन्स परीक्षांसाठी वेगवेगळ्या अभ्यास पद्धती अवलंबण्याचा सल्ला दिला. तसेच, दररोजच्या अभ्यासाचे नियोजन, चालू घडामोडींचा अभ्यास, मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि उत्तरलेखन सराव यावर विशेष भर दिला. त्यांनी मुलाखत (इंटरव्ह्यू) टप्प्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य आणि चालू घडामोडींवरील ठोस मत मांडण्याची तयारी ठेवण्यावर भर दिला. त्यांनी स्वतःच्या अनुभवातून वेळेचे व्यवस्थापन, सातत्य आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व स्पष्ट केले.

यावेळी उद्यानविद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. आर. पी. गजभिये यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. अभ्यासात संकल्पनात्मक स्पष्टता, आकृत्या व उदाहरणांचा वापर आणि तांत्रिक शब्दसंग्रहावर प्रभुत्व मिळविण्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करताना जास्तीत जास्त सराव करण्याचे आवाहन केले कि, जेणेकरून त्याचे प्रभावी आकलन होईल.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे हे होते. त्यांनी मूलभूत विषयांवर भक्कम पकड ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि कृषी विषयातील संकल्पना स्पष्ट असणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाबरोबरच नोट्स तयार करणे, स्व अभ्यासाची सवय लावणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे मार्गदर्शन केले. तसेच अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकून पुढे जाण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक (वनस्पती रोगशास्त्र) डॉ. गितांशु डिंकवार यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन श्री. नागेश नवघरे यांनी मानले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी जागरूकता वाढली असून त्यांना योग्य दिशेने अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थीव प्राध्यापकवर्ग उपस्थित होते.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!