Saturday, June 13, 2026
Homeमार्गदर्शन कार्यक्रमशेतकऱ्यांनो दुबार पेरणीचे संकट टाळा पेरणीपूर्वी बीज उगवण क्षमता चाचणी करा

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

शेतकऱ्यांनो दुबार पेरणीचे संकट टाळा पेरणीपूर्वी बीज उगवण क्षमता चाचणी करा

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

        डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय मुल येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव म्हणजेच रावे (RAWE) या कार्यक्रमांतर्गत नोंदणी केलेल्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील पारडी तालुका येथे दिनांक ५ जून २०२६ रोजी शेतकरी बंधू करिता बीज उगवण क्षमता चाचणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .बीज उगवण क्षमता चाचणी हा कार्यक्रम प्रमुख घेण्यामागचा उद्देश म्हणजे की शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे व उत्तम,शुद्ध व दर्जेदार बी व खोट्या बियां व भेसळयुक्त बियांनापासून शेतकऱ्यांना सावध करणे आणि शेतकऱ्यांमध्ये भेसळयुक्त व दर्जेदार व या बियाणां मधील फरक स्पष्टीकरण करणे व जनजागृती करणे व त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दुबार पेरणीचा खर्च कमी करणे हा होता.


या कार्यक्रमांध्ये प्रामुख्याने कृषी महाविद्यालय,मुल येथील कृषीदुता मार्फत शेतकऱ्यांना बीज उगवण क्षमता चाचणीचे महत्त्व पटवून संबंधित प्रमुख माहिती सांगण्यात आली. कृषीदुता मार्फत बीज तपासणीचे आवाहन: बदलत्या हवामानामुळे आणि निकृष्ट बियाण्यांच्या तक्रारींमुळे दुबार पेरणीचा धोका टाळण्यासाठी कृषी विभागाने बियाण्यांची ‘उगवण चाचणी’ करण्याचे आवाहन केले आहे.घरच्या घरी चाचणी: शेतकरी स्वतः गोणपाट किंवा ओल्या कागदाच्या (पेपर टॉवेल) मदतीने घरच्या घरीच १०० बिया घेऊन उगवणक्षमता तपासु शकतात.योग्य बियाणे ओळख: १०० बियांपैकी किमान ७०-८०बिया सुदृढपणे उगवल्या (७०-८०% उगवणक्षमता) तरच ते बियाणे पेरणीसाठी योग्य मानले जाते.अधिक बियाणे वापर: उगवणक्षमता ६०% ते ७०% दरम्यान असल्यास टक्क्यानुसार बियाण्याचे प्रमाण वाढवावे, मात्र ५०-६०% पेक्षा कमी उगवण असलेले बियाणे पेरणीसाठी वापरू नयेत. कृषीदुतांनी स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवत व बीज उगवण क्षमता चाचणी याचे शेतकऱ्यांपर्यंत महत्त्व पटवून दिले . व शेतकऱ्यांमध्ये आपले विचार मांडत, शेतकऱ्यांनो आधी चाचणी मगच पेरणी, कमी खर्चात निश्चित करा बियाणांची गुणवत्ता बियाण्यांच्या उगवण क्षमतेमुळे मिळेल अचूक रोपसंख्या; उत्पादनात होणार मोठी वाढ.
पेरणीआधी बियाण्यांची उगवणक्षमता तपासा; दुबार पेरणीचा धोका टाळा , दिसायला चमकदार बियाण्यांवर फसू नका; पेरणीपूर्वी बीज उगवण क्षमता चाचणी आवश्यक.
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ,असे अनेक नाविन्यपूर्ण विचार मांडत कृषी दुतांनी जनजागृती केली व शेतकऱ्यांचा विश्वास संपादित केला.

कृषी महाविद्यालय मुलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही.जे. अतकरे यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. आर.पी.गजभिये , कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष लाडे , व सोनापुर,गडचिरोली येथील कृषी संशोधन केंद्र, प्रभारी डॉ.गणवीर व प्राध्यापक डॉ. सुवर्णा नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
कृती प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले व या कृती प्रात्यक्षिका वेळी उपस्थित गावातील गावकरी, तरुण वर्ग ,विद्यार्थी, आणि शेतकरी वर्ग उपस्थित होऊन आपला अमूल्य सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचा मुख्य तांत्रिक गाभा व प्रात्यक्षिक कृती, छायाचित्रण,माहिती मार्गदर्शन,माहिती स्पष्टीकरण म्हणून कृषी महाविद्यालय मुल येथील विद्यार्थी गुरुदेव असोले ,श्रीराम धनजोडे ,अथर्व डोंगरे, व अनिकेत फरकडे, यांनी केले . व शेतकऱ्यांना योग्य व शास्त्रीयरित्या प्रात्यक्षिक करून दाखवले . त्यानंतर कृषीदूतान मार्फत शेतकरी बंधूनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे व शंकांचे निरसन केले . व शेतकऱ्यांचा मोलाचा असा विश्वास संपादन केला.

हा उपक्रम खरोखर समाधानकारक व प्रेरणादायी ठरला व शेतकऱ्यांमध्ये बीज उगवण क्षमता चाचणी ही का गरजेची आहे व त्याचा आपल्याला भविष्यातील होणारा अगणित असा फायदा पटवून दिला. हा कार्यक्रम खरोखरच समाधानकारक व यशस्वीरित्या पार पडला असे उपस्थितांचे मत आहे आहे.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!