Saturday, June 13, 2026
Homeसत्कारमुल शहर भाजपाच्या वतीने डॉ. सेजल बबन गुंडावार यांचा सत्कार व अभिनंदन

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मुल शहर भाजपाच्या वतीने डॉ. सेजल बबन गुंडावार यांचा सत्कार व अभिनंदन

मूल  ( मेहुल मनियार )

      मूल येथील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री. बबन गुंडावार यांच्या कन्या डॉ. सेजल बबन गुंडावार यांनी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर पदवी यशस्वीरित्या संपादन करून आपल्या कुटुंबासह मूल शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भारतीय जनता पार्टी, मूल शहरच्या वतीने त्यांचा सत्कार करून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी डॉ. सेजल गुंडावार यांच्या कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक केले. वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत समाजसेवेचे व्रत जपत नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी मोलाचे योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
डॉ. सेजल गुंडावार यांचे हे यश मूल शहरातील विद्यार्थी व युवांसाठी प्रेरणादायी ठरणारे असून त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपस्थित सर्वांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टी, मूल शहरचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!