Friday, December 19, 2025
Homeसंताजी जगनाडे महाराज जयंतीमुल येथे श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मुल येथे श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

 

मुल :

        मूल येथील मा. सां. कन्नमवार सभागृहात श्री संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्ष म्हणून माजी आमदार देवराव भांडेकर तर उद्घघाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ता संदीप गुलाबराव आगडे हे उपस्थित होते.

       प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक स्वप्निल येरणे, महासचिव कैलास चलाख , शांताराम कामडी, माजी सभापती घनश्याम येनुरकर, माजी नगरसेवक अनिल मोगरे, महेंद्र करकाडे, अनिल साखरकर , तालुका अध्यक्ष राजेश सावरकर, चेतना येनुरकर आदींची उपस्थित लाभली.
तेली समाजाच्या वतीने काढलेल्या रॅली मध्ये मोठया संख्येने लोकांनी सहभाग घेतला. या शोभा रॅलीमध्ये आपल्या विशिष्ट पेहरावामध्ये महिला भगिनी लेझीम, भजन व श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयघोष करीत गांधी चौकातून कन्नमवार सभागृहापर्यंत सामील झाले.
सभागृहामध्ये समाजाच्या वतीने आयोजित समाज प्रबोधन व गुणगौरवाचा सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी वर्ग १० व वर्ग १२ मध्ये विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी तसेच विशिष्ट खेळामध्ये नेत्रदिपक प्रगती साधलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. महिलांसाठी विशेष मार्गदर्शिका म्हणून स्त्रीरोगतज्ञ डॉ. मनिषा शेंडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. तिलक कामडी यांचे मार्गदर्शन झाले. स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन करताना उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल गव्हारे यांनी समाजातील परिस्थिती आणि त्यातून काढलेल्या मार्गांचा उल्लेख केला. यश संपादन करीत असताना आपल्याला काय साध्य करायचे आहे याविषयी अतिशय चिकाटीने अभ्यास केल्यास आपल्याला यश मिळविता येते हे त्यांनी स्वानुभावातून, अनेक उदाहरणाचे दाखले देऊन सांगितले. यावेळी सर्व मार्गदर्शकांचा समाजाच्या वतीने शाल देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मुलींचे व स्त्रियांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
समाजाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमांमध्ये प्रास्ताविक कैलास चलाख तर संचालन सेवानिवृत्त प्राचार्य गंगाधर कुनघाडकर आणि आभार प्रदर्शन सुशिला उडान यांनी केले.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!