Friday, December 19, 2025
Homeवाघाचा हमलावाघाच्या हल्यात गुराखी ठार... बेलगाटा येथील घटना..

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

वाघाच्या हल्यात गुराखी ठार… बेलगाटा येथील घटना..

मूल

मूल तालुक्यातील बेलगाटा येथील रहिवासी पितांबर गुलाब सोयाम (वय ३७) यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या बाबत सांगितले जाते की, ते काल गुरे चरायला जंगलात गेले होते; मात्र सायंकाळपासून ते बेपत्ता होते.

आज सकाळी गावकरी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगलात शोधमोहीम राबवली असता, त्यांचा मृतदेह आढळून आला. वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.

या घटनेमुळे बेलगाटा परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने नागरिकांना जंगलात जाताना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.  मृतकाच्या कुटुंबीयांना शासकीय मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!