Friday, December 19, 2025
Homeमहापरिनिर्वाण दिनआंबेडकरी विचार तरुणांनी आत्मसात करणे ही काळाची गरज – प्राचार्य डॉ.अनिता वाळके

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

आंबेडकरी विचार तरुणांनी आत्मसात करणे ही काळाची गरज – प्राचार्य डॉ.अनिता वाळके

मूल ( मेहुल मनियार )

     शिक्षण प्रसारक मंडळ, मूल संचालित कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. उपस्थितांनी मौन पाळून महापुरुषांना विनम्र आदरांजली अर्पण केली.

या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिता वाळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संविधानिक मूल्यांचा वारसा प्रत्येक युवकाने आपल्या आचरणात उतरवणे ही आजच्या समाजाची गरज आहे. समानता, बंधुता, शिक्षण आणि स्वाभिमान या बाबासाहेबांच्या विचारांमुळेच समाज प्रगत होऊ शकतो.”

त्यांनी पुढे सांगितले की तरुण पिढीने बाबासाहेबांचे विचार फक्त स्मरणात न ठेवता ते प्रत्यक्ष जीवनात राबविणे आवश्यक आहे. समाजातील विषमता दूर करून प्रगत, सुशिक्षित आणि न्याय्य समाजव्यवस्था निर्माण करण्याचे सामर्थ्य बाबासाहेबांच्या चिंतनात आहे, असेही ते म्हणाले.

 महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर, प्राध्यापकवर्ग, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा समावेश होता. कार्यक्रमात उपस्थितांनी बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सामाजिक जाणीव मजबूत करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या कर्मचारी वर्गाने केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!