Friday, December 19, 2025
Homeनगर परिषद निवडणूक 2025मूल नगर परिषद निवडणूक 2025: ईव्हीएम स्ट्रॉन्ग रूम मध्ये मोबाईल जॅमर बसवण्याची...

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल नगर परिषद निवडणूक 2025: ईव्हीएम स्ट्रॉन्ग रूम मध्ये मोबाईल जॅमर बसवण्याची मागणी

मूल

नगर परिषद निवडणूक 2 डिसेंबर रोजी शांततेत पार पडली असून मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. मतमोजणीपूर्वी ईव्हीएम स्ट्रॉन्ग रूम च्या सुरक्षेबाबत शिवसेना (शिंदे गट) महिला आघाडीच्या वतीने महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे.

शिवसेना शिंदे गट महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख व नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. भारती सुनील राखडे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मृदुला मोरे यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात सांगण्यात आले की, ईव्हीएम ठेवण्यासाठी तयार केलेल्या स्ट्रॉन्ग रूम मध्ये अत्यंत काटेकोर सुरक्षा आवश्यक आहे. सध्या या परिसरात मोबाईल नेटवर्क उपलब्ध असल्यामुळे अनधिकृत सिग्नल, इलेक्ट्रॉनिक इंटरफेरन्स किंवा कोणत्याही प्रकारचे सायबर/इलेक्ट्रॉनिक धोके संभवू शकतात.निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहावी, तसेच लोकशाही प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास टिकून राहावा यासाठी स्ट्रॉन्ग रूम मध्ये परिसर पूर्णतः सिग्नल-मुक्त असणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

यासाठी स्ट्रॉन्ग रूम परिसरात तात्काळ “मोबाईल जॅमर” बसवावेत, ज्यामुळे मोबाईल नेटवर्क, इंटरनेट सिग्नल किंवा कोणत्याही वायरलेस कम्युनिकेशनचा प्रभाव स्ट्रॉन्ग रूम जवळ राहणार नाही, अशी मागणी करण्यात आली.मोबाईल जॅमर बसविल्यास स्ट्रॉन्ग रुम ची सुरक्षा अधिक मजबूत होईल व मतमोजणी प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित राहील, असे मतही निवेदनात व्यक्त करण्यात आले.

शासनाकडून या मागणीचा गांभीर्याने विचार करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!