Friday, December 19, 2025
Homeविज्ञान प्रदर्शनबल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथे विज्ञान प्रदर्शनी आणि क्रीडा स्पर्धाचे आयोजन

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

बल्लारपूर पब्लिक स्कूल, मूल येथे विज्ञान प्रदर्शनी आणि क्रीडा स्पर्धाचे आयोजन

मूल  ( मेहुल मनियार )

       येथील बल्लारपूर पब्लिक स्कूल 13 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत चार दिवसीय क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनी आणि इतर विषयाची प्रदर्शनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यकर्माचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य विनोद बोलीवार तसेच मुख्य अतिथी म्हणून कृषक विद्यालय सुशी चे अरुण चिंचघरे आणि शैक्षणिक प्रभारी दुर्गा कोटगले उपस्थित होते. विविध खेळाच्या माध्यमातून विद्यार्थांचा सर्वांगीण विकास घडून येण्यासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष ऍड. अनिल वैरागडे तसेच मुख्य अतिथी म्हणून नवभारत विदयालय मूल चे प्राचार्य अशोक झाडे, देवनील विदयालय टेकाडी चे मुख्याध्यापक राजेश सावरकर, स्व. बापूजी पाटील विद्यालय राजगड चे माजी मुख्याध्यापक धवस  आणि कर्मवीर महाविद्यालय चे प्रा. डॉ. आगलावे आणि शाळेचे प्राचार्य श्री विनोद बोलीवार मंचावर उपस्थित होते.

शाळेचे प्राचार्य बोलीवार सर यांनी विज्ञान प्रदर्शनी आणि इतर विषयाचे प्रदर्शन याच्या बद्दल विद्यार्थांना विविध उदाहरणे आणि दाखले देऊन मत्रमुग्ध केले तसेच सर्व मान्यवारांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थांना वैज्ञानिक दृष्टी कशी सद्या केली जाते आणि वैज्ञानिकानी संशोधन कसे केले हे आपल्या मनोगतातून सांगितले.  विद्यार्थांनी विज्ञान गणित भाषा आणि सामाजिक शास्त्र या विषयाची मांडणी केलेल्या प्रतिकृतीची फीत कापून प्रदर्शनी खुली केली आणि मान्यवारांनी मांडणी केलेल्या प्रतिकृतीची पाहणी केली. विज्ञान प्रदर्शनी आणि इतर विषयाची प्रदर्शनी साठी परीक्षक म्हणून विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका दुर्गा कोटगले, दर्शना कुकडकर, हिना वाघाडे, तोषी जयस्वाल हिने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौं तोषी जयस्वाल यांनी केले तर आभार प्रदर्शन सौं. दुर्गा कोटगले हिने केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी अथक परिश्रम घेतले आणि कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्टगानाने झाली

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!