Wednesday, February 18, 2026
Home12 वी परीक्षाआज पासून बारावी बोर्डाची परीक्षा सुरळीतपणे सुरू

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

आज पासून बारावी बोर्डाची परीक्षा सुरळीतपणे सुरू

मूल ( मेहुल मनियार )

महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डातर्फे घेण्यात येणारी 12 वी ची परीक्षा आज पासून सुरळीतपणे सुरू झाली आहे. मूल परीरक्षक विभागात वेगवेगळ्या पाच परीक्षा केंद्रातून 1619 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
या परीक्षेसाठी परिरक्षक म्हणून मूल पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी जयश्री गुज्जनवार असून सहपरिरक्षक म्हणून विजय बावणे यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
मूल परिरक्षक विभागा अंतर्गत कर्मवीर महाविद्यालय मूल ( 0238 ), नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, मूल     (0239 ), आनंद कनिष्ठ महाविद्यालय बेंबाळ ( 0240 ), राष्ट्रमाता कनिष्ठ महाविद्यालय, देवाडा खुर्द ( 0276 ) आणि एम.जी. कनिष्ठ महाविद्यालय राजोली (0284 )असे पाच केंद्र असून एकूण 1619 विद्यार्थी प्रविष्ट आहे. कर्मवीर महाविद्यालय मुल केंद्रावर 465, नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मुल केंद्रावर 377, आनंद कनिष्ठ महाविद्यालय बेंबाळ केंद्रावर 335,  राष्ट्रमाता कनिष्ठ महाविद्यालय देवाडा खुर्द केंद्रातून 118  आणि एम.जी.कनिष्ठ महाविद्यालय राजोली या केंद्रातून 324 असे एकूण 1619 परीक्षार्थी या परीक्षेत प्रविष्ट आहेत.  सर्व केंद्रावर सुरळीतपणे परीक्षा सुरू असून पोलीस विभागातर्फे सुद्धा योग्य बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!