Wednesday, February 18, 2026
Homeनशा मुक्त भारत अभियानकृषि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत "नशा मुक्त भारत अभियान" जनजागृती कार्यक्रम...

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

कृषि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत “नशा मुक्त भारत अभियान” जनजागृती कार्यक्रम संपन्न

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

   मूल येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली “नशा मुक्त भारत अभियान” अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजामध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यानिमित्ताने कृषि महाविद्यालय ते गांधी चौक, मूल दरम्यान जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत कर्मचारी व  विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून व्यसनमुक्त समाजाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला.

 

 या निमित्त आयोजित कार्यक्रमास  उद्यानविद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. आर. पी. गजभिये हे होते. त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या उदाहरणाद्वारे व्यसनाचे दुष्परिणाम स्पष्ट करत, “चांगले काय व वाईट काय याची जाणीव ठेवून जीवन जगावे. नशा करणारे लोक कधीच खरे हिरो बनू शकत नाहीत,” असा प्रभावी संदेश विद्यार्थ्यांना दिला. प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हा रुग्णालय मुलच्या NCD समुपदेशक सौ. ममता मोहन शेंडे, यांनी व्यसन म्हणजे काय, लोक कशा प्रकारे व्यसनाच्या आहारी जातात, त्याचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम तसेच शासनाच्या विविध योजना व कायदे याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी सर्व उपस्थितांनी “नशा मुक्त भारत अभियान” अंतर्गत व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेतली. सौ. मीना नंदनवार (ICTC समुपदेशक) यांनी विद्यार्थ्यांना मैत्रीच्या नात्यात वावरताना चांगल्या सवयी आत्मसात करण्याचे व कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले, सदर कार्यक्रमास सौ. वैष्णवी प्रकाश ऐतवार (मास्टर्स इन क्लिनिकल सायकोलॉजी) यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी  डॉ. आशिष लाडे  यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!