Wednesday, February 18, 2026
Homeदिव्यांग प्रमाणपत्रदिव्यांग यु.डी.आय.डी प्रमाणपत्र सादर करणेबाबत - नायब तहसिलदार चिडे यांचे आव्हान

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

दिव्यांग यु.डी.आय.डी प्रमाणपत्र सादर करणेबाबत – नायब तहसिलदार चिडे यांचे आव्हान

मूल – ( मेहुल मनियार )

       तालुक्यातील विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना संदर्भीय शासन. निर्णय क्र.01 अन्वये मासिक मानधन 2500/- रु देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे यु. डी. आय. डी. कार्ड व वैध प्रमाणपत्र असेल तरच त्यांची माहिती पोर्टलवर अद्यावत करुन लाभ देण्यात यावा व ज्या लाभार्थ्यांकडे यु. डी. आय. डी. कार्ड व वैध प्रमाणपत्र नसल्यास लाभ बंद करण्यात यावा असे निर्देश संदर्भिय क्र.02 अन्वये प्राप्त झालेले आहेत.
त्याअनुषंगाने मुल तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना सुचना करण्यात येते की, दिव्यांग (अपंगत्व) असल्याचे प्रमाणपत्र व यु.डी. आय. डी. कार्ड ची झेरॉक्स प्रत मोबाईल नंबरसह दिनांक 15/02/2026 पर्यत संबंधित ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) यांचेकडे तसेच तहसिल कार्यालय, मुल येथील संगायो शाखेत न चुकता सादर करावे. जेणेकरुन दिव्यांग लाभार्थ्यांना DBT पोर्टलव्दारे दिव्यांग बाबतची माहिती अपडेट करण्यात येऊन 2500 /- रु मानधन जमा करण्यात येईल व योजनेचा लाभ सुरु राहील.
 ज्या लाभार्थ्यांनी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र व यु. डी. आय. डी कार्ड विहित मुदतीचे आत सादर न केल्याने योजनेतुन नाव कमी करण्यात येऊन लाभ बंद करण्यात येईल व सदरहू लाभार्थ्यास जबाबदार धरण्यात येईल याची मुल तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांनी नोद घ्यावी. असे आदेश प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात नायब तहसिलदार, (संगायो)
तहसील कार्यालय,मूल यांनी कळविले आहे.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!