Wednesday, February 18, 2026
Homeशपथ ग्रहणमूल ( आकापूर ) येथील देवनिल कॉलेज ऑफ नर्सिंग येथे शपथविधी सोहळा...

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल ( आकापूर ) येथील देवनिल कॉलेज ऑफ नर्सिंग येथे शपथविधी सोहळा संपन्न

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार)

    परिचारिका ही रुग्णालयाचा कणा आहे, कुठल्याही परिस्थितीत न डगमगता रुग्णसेवा करणे हे परिचारिकेचे आद्य कर्तव्य आहे. असे आवाहन डॉ. वासुदेवराव गाडेगोणे यांनी केले.

     ते देवनील शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित मूल (आकापूर) येथील देवनिल कॉलेज ऑफ नर्सिंग येथे बी.एस.सी. नर्सिंग, जी. एन.एम व ए.एन. एम. मध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळ्या प्रसंगी आपले विचार व्यक्त करीत होते.

        विशेष अतिथी डॉ. प्रेरणा कोलते यांनी रुग्णालय व रुग्ण यातील दुवा म्हणजे परिचारिका असे संबोधित केले. डॉ. मोनिका कोतपल्लीवार यांनी परिचारिकेशी प्रेमाने व सहानुभूतीने वागावे असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. देवरावजी भांडेकर यांनी परिचारिकेने रुग्णाला उच्च दर्जाची रुग्णसेवा द्यावी असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व क्रीडा संमेलनाचे आयोजन करून बक्षिस वितरण करण्यात आले.याप्रसंगी मा. देवरावजी भांडेकर (माजी आमदार), उद्घाटक डॉ. वासुदेवराव गाडेगोणे, विशेष अतिथी डॉ. नरेंद्र कोलते, डॉ. प्रेरणा कोलते, डॉ. मोनिका कोतपल्लीवार, डॉ. स्मिता भांडेकर, डॉ.महेश भांडेकर, प्राचार्य भावना टेकाम व शिक्षक वृंद यांची उपस्थिती होती. मान्यवरांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.प्राचार्य भावना टेकाम यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे संचालन कु.फाक्गुनी जराते व कु.मनाली घुबडे या विद्यार्थिनींनी केले. तर आभार कु.रोहिणी कामीडवार या विद्यार्थिनींनी मानले.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!