Wednesday, February 18, 2026
Homeवार्षिक सभायशस्वी महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

यशस्वी महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

मूल : ( मेहुल मनियार )

         मूल पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या उमेद प्रकल्पातील चिंचाळा–केळझर जिल्हा परिषद क्षेत्रातील यशस्वी महिला प्रभाग संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दि. 4 रोजी चिरोली येथील अर्चना सभागृहात उत्साहात पार पडली.
या सभेचे उद्घाटन उमेद प्रकल्पाचे तालुका अभियान व्यवस्थापक नितीन वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशस्वी महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा विशाखा गणवीर या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून क्षमता बांधणी अधिकारी संतोष वाढई, प्रभाग समन्वयक बंडू लेनगरे, प्रभाग संघाच्या सचिव सोनी उराडे, कोषाध्यक्ष पायल देवईकर, तसेच स्वाती आयलनवार, सुनंदा वनकर, संगीता काळे, प्रियंका शेंडे, किरण निमगडे, शिल्पा मंकीवार, रोजना शिंदे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.


सभेमध्ये यशस्वी महिला प्रभाग संघाचा वार्षिक लेखाजोखा सादर करण्यात आला. यावेळी अध्यक्ष विशाखा गणवीर यांनी आपल्या मनोगतातुन उमेद प्रकल्पामुळे ग्रामीण महिलांच्या आर्थिक, सामाजिक व वैयक्तिक विकासाला नवी दिशा मिळाली असून महिलांमध्ये आत्मविश्वास, स्वयंरोजगार व नेतृत्वगुण निर्माण झाले आहेत, असे सांगितले.  महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी होऊन कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.तसेच उमेद प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांनी संघटित राहून शिक्षण, आरोग्य व आर्थिक सक्षमीकरणाच्या संधींचा लाभ घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सर्वसाधारण सभेनंतर महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका रेड्डीवार व गीता चलाख यांनी केले. प्रास्ताविक पायल देवईकर, तर आभार प्रदर्शन सारिका बावणे यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी महिला प्रभाग संघांतर्गत येणाऱ्या शेकडो महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाग संघाच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!