- मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )
मूल येथील माऊंट कॉन्व्हेंट अँड जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण सभागृह आकर्षक फुलांच्या सजावटीने, रंगीबेरंगी फुग्यांनी व प्रकाशयोजनांनी नटले होते. विद्यार्थ्यांनी “Farewell 2026” अशा सुंदर फलकांनी मंच सजविला होता.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी. भाऊराव झाडे (अध्यक्ष) विराजमान होते. प्रमुख पाहुणे म्हणून मान.शोभा झाडे यांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.
विशेष अतिथी म्हणून मा. सुहास झाडे तसेच प्राचार्या रीमा कांबळे मॅडम (प्राचार्या) उपस्थित होत्या.



