Wednesday, February 18, 2026
Homeअस्थी दर्शनराज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादाच्या अस्थीकलशाचे मुल वासीय जनतेने घेतले अंतिम दर्शन

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादाच्या अस्थीकलशाचे मुल वासीय जनतेने घेतले अंतिम दर्शन

मूल ( मेहुल मनियार )

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा यांचे विमान दुर्घटनेत अकस्मात निधन झाले.महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य माणसाला हा मोठा धक्का होता. वेळेअभावी लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन महाराष्ट्र राज्यातील लाखो लोकांना इच्छा असूनही घेता आले नाही.

    यासाठी महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी, शेतकरी, महिला भगिनी, नौकरदार, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी यांना त्याचे दर्शन घेता यावे म्हनुन पवार कुटूंबीयाना विनंती करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रत्येक जिल्हात अस्थीकलश जनतेच्या दर्शनासाठी ठेवन्यात येत आहे. मुल येथील गांधी चौकात अस्थीकलश जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

  • चंद्रपूर येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर याच्याकडून अजितदादा याचे अस्थीकलश चंद्रपूर जिल्हापरिषदचे माजी अध्यक्ष प्रकाश पा. मारकवार, राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा जिल्हाध्यक्ष मंगेश पोटवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अजिंक्य पा. मारकवार यांनी स्वीकारून मुल येथे जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अस्थीकलशाचे पूजन करून मुलवासीय जनतेला दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आले.महाराष्ट्र राज्याचा विकास हाच केंद्र बिंदू मानून काम करणाऱ्या लोकनेत्याच्या अस्थीकलशाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मुल शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्ते,सामाजिक संघटना प्रतिनिधी, मुल नगरपरिषदचे नगरसेवक, व्यापारी बंधूनी अस्थीकलशचे दर्शन घेऊन पुष्पअर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी उपस्थितीत सर्वांनी मौन पाडून अजितदादा यांना श्रद्धांजली दिली.

    यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रकाश पा. मारकवार, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष विनोद अहिरकर,मुल पंचायत समितीचे माजी सभापती चंदूभाऊ मारगोनवार, भाजपाचे मुल शहर अध्यक्ष प्रवीण मोहुर्ले, नगरपरिषद मुलचे माजी उपाध्यक्ष अनिल संतोषवार, शहरातील प्रसिद्ध उद्योगपती जिवन कोंतमवार, नगरसेवक विवेक मूत्यालवार, रितिक गोयल, सौं.अश्विनीताई निकोडे, सौं. प्राचीताई आक्केवार,मुल नगरपरिषदच्या सभापती नलिनीताई आडेपवार, मुल नगरपरिषद महिला बाल कल्याण उपसभापती सौं. समीक्षाताई कडस्कर,समता परिषदचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले माजी सरपंच संजय येनूरकर, मिलिंद खोब्रागडे, जेष्ठ पत्रकार संजयभाऊ पडोळे,भोजराज गोवर्धन,  माजी प्राचार्य गंगाधर कुणघाडकर, जगदीश कडस्कर, ट्रॅव्हल्स युनियनचे अध्यक्ष शयाम उराडे,भाजपा महिला आघाडी अध्यक्ष मनीषाताई गांडलेवार , काँग्रेसचे युवा नेते सौरव वाढई,चांदापूरचे प्रभारी सरपंच अशोक मार्गनवार,डॉ. कुळे,सतीशभाऊ आकूलवार, गुरूदास गिरडकर,सौं. सरिताताई पोटवार,  कुमुदिनी भोयर,सौं. धाराताई मेश्राम,संगीताताई गेडाम, शीतलताई वाढगुरे, सौं. अर्चनाताई चावरे,सुवर्णाताई रामटेके, सौं. रजानाताई सुखदेवे,प्रशांत भरतकर,माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील कामडी, राकेश गेडाम, विकास गेडाम,रोशन अलाम, रोशन गुरुनुले, पिलाजीत सोनुले आणि मुल शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!