Tuesday, April 21, 2026
Homeविद्यार्थ्यांचे सुयशमूल येथील माऊंट कॉन्व्हेंट अँड जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांचे विज्ञान...

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील माऊंट कॉन्व्हेंट अँड जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रदर्शनीत सुयश

 

मूल –

     महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, चिरोली येथे आयोजित दोन दिवसीय 53 वी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी 28 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न झाली. या प्रदर्शनीत माउंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, मूल येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यशाची नोंद केली.

प्राथमिक गटात कु. रुचिका तेलावर आणि कु. माही ब्राह्मणवाडे (इयत्ता 8 वी) यांनी विज्ञान शिक्षक व उपमुख्याध्यापक असपाक सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली द्वितीय क्रमांक मिळविला.

      इयत्ता 9 वीतील कु.आरुषी भीमटे हिने वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून दुहेरी यश संपादन केले. विद्यार्थ्यांच्या सर्व कामगिरीत विज्ञान शिक्षक अशपाक सय्यद यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.

या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष भाऊराव झाडे, मुख्याध्यापिका रीमा कांबळे, ज्युनियर कॉलेज इन्चार्ज दुष्यंत गणवीर, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!