Tuesday, April 21, 2026
Homeस्वच्छ भारतस्वच्छता ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली.... कृषि महाविद्यालयाचा प्रशंशनीय उपक्रम.

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

स्वच्छता ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली…. कृषि महाविद्यालयाचा प्रशंशनीय उपक्रम.

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत असलेल्या मुल येथील कृषी महाविद्यालयातर्फे परिसर स्वच्छतेचा उपक्रम सतत चालविला जात आहे. या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे आणि त्यांच्या संपूर्ण प्राध्यापक वृंदासह या उपक्रमाला यशस्वीपणे राबविण्याचा विडा उचलला आहे. स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत पडीक जमिनीवर (काटेरी झुडपे असलेल्या) प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांनी उद्यानविद्या प्रात्यक्षिक अंतर्गत पीक संग्रहालयामध्ये विविध भाजीपाला व फुल पिकांची लागवड केली.
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत या महाविद्यालयाच्या ३० व्या आणि एकूण:४८६ व्या करण्यात आलेल्या आव्हानाला सर्वच प्राध्यापक व प्राध्यापिका, समस्त विद्यार्थि (UG) तसेच महाविद्यालयीन सहाय्यक कुलसचिव त्यांचे अधिनिस्त समस्त अधिकारी कर्मचारी यांच्या तर्फे उत्तम प्रतिसाद मिळत आहे.


डॉ. अतकरे यांनी सांगितले की,आपल्या आसपास असलेल्या परिसराची स्वच्छता ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असते कारण आजूबाजूला कचरा टाकणे ही अत्यंत वाईट सवय असून त्याने अस्वच्छता पसरते आणि आजारा ला सुद्धा आमंत्रण मिळू शकते. स्वच्छतेचा प्रश्न लक्षात घेऊनच शासनाने स्वच्छ भारत अभियानास सुरुवात केली आहे. त्यालाच अनुसरून कृषि महाविद्यालयाचा हा उपक्रम सतत सुरू आहे. वैयक्तिक आणि परिसर स्वच्छता हे चांगल्या आरोग्याचे खरे रहस्य आहे.
डॉ. अतकरे यांनी मूल येथे रुजू झाल्यापासून आपल्या सात महिन्याच्या कार्यकाळात महाविद्यालयाच्या परिसराचा कायापालट केलेला आहे. स्वच्छता अभियाना अंतर्गत त्यांनी परिसराच्या स्वच्छतेकडे पुरेसे लक्ष पुरविले आहे. नागपूर आणि इतर कृषी महाविद्यालयाच्या त्यांच्या कार्यकाळात आज पावतो त्यांनी 486 स्वच्छतेचे उपक्रम चालविले आहे. या उपक्रमाला महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी त्यांचे सहकार्य मिळत आहे, याबद्दल त्यांनी आभार सुद्धा व्यक्त केले आहे.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!