Tuesday, April 21, 2026
Homeगॅस सिलेंडर समस्याआमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार भाजप शिष्टमंडळाची सिलेंडर समस्या बाबत तहसीलदार सोबत...

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार भाजप शिष्टमंडळाची सिलेंडर समस्या बाबत तहसीलदार सोबत चर्चा

गॅस सिलेंडर आता होणार तारखेनुसार वाटप

मूल ( मेहुल मनियार )

मुल शहरातील सिलेंडर वाटप प्रक्रियेत मागील काही दिवसांपासून प्रचंड घोळ झाला असून एक एक महिन्यांपासून ओटीपी येऊनही ग्राहकांना सिलेंडर मिळत नव्हते. सिलेंडर मिळवून देणे, पैसे देऊन सिलेंडर मिळाले अश्या प्रकारचे आरोप होणे, रांगेत लागूनही सिलेंडर न मिळणे अश्या अनेक तक्रारी ग्राहकांकडून प्राप्त होत होत्या. ग्राहकांना अनेक दिवस हेलपाट्या घालूनही सिलेंडर मिळत नव्हते, अनेक सामाजिक संघटना , राजकीय पक्ष यांनी सुद्धा तहसील कार्यालयात या बाबत निवेदन दिले.

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने सुद्धा शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात निवेदन दिले. जनतेने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणलेल्या बाबी नुसार आमदार मुनगंटीवार यांनी तहसीलदार मृदुला मोरे  यांना याबाबतीत सूचना केल्या. आज तहसीलदार मृदुला मोरे यांनी आमदार मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार गॅस एजन्सी धारकांची बैठक बोलावुन काही स्पष्टपणे सूचना दिल्या. बैठकीत खालील प्रमाणे गोष्टी ठरल्या.
1. सिलेंडर वाटप हे दर बुधवारी क्रीडा संकुलात तर इतर दिवशी महात्मा फुले आठवडी बाजारात वाटप होईल
2. बुकिंग केलेल्या तारखेनुसार रोज सायंकाळी एजन्सी धारक तहसील कार्यालयाला साधारण 400 सिलेंडर धारकांची यादी देईल
3. सदर यादीनुसारच दुसऱ्या दिवशी वाटप होईल,
4. यादीत नाव नसलेल्या ग्राहकांनी गर्दी करायची नाही, ज्यांचे यादीत नाव असेल त्यांचे ओळखपत्र व इतर संबंधित कागदपत्रे बघूनच वाटप होणार आहे
5. वाटप करतांना पोलीस बंदोबस्त राहणार असून कुणीही गडबड न करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे
6. या बाबतीत तहसील कार्यालय एक प्रेस नोट काढून जनतेला सूचना देणार असल्याचे कळते.
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना मुल साठी कोटा वाढवून देण्याच्या सूचना सुद्धा दिल्या असून लवकरच सिलेंडर ची प्रतीक्षा संपणार आहे असे दिसते.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!