Saturday, June 6, 2026
Homeनगर परिषद निवडणूक 2025अजयची अजिंक्यता,संजनाची एकजूटता!प्रभाग १ मध्ये भाजपचा विजय निश्चित!

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

अजयची अजिंक्यता,संजनाची एकजूटता!प्रभाग १ मध्ये भाजपचा विजय निश्चित!

मूल
प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपचे उमेदवार अजय गोगुलवार आणि संजना मडावी यांनी संपूर्ण प्रभागाचा राजकीय रूख पूर्णपणे आपल्या बाजूने वळवला आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रा. डॉ. सौ. किरण कापगते यांना मिळणाऱ्या मताधिक्याला प्रभाग १ मधील ही जोडी मोठे बळ देणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
अजय” या नावाचा अर्थच,ज्याचा पराभव कधीच होत नाही असा अजिंक्य, तर “संजना” या नावाचा अर्थ एकत्र येणारी, संघटित करणारी, ही नावांची जादूच जणू प्रत्यक्ष राजकारणात उतरली असल्याचे चित्र दिसत आहे. विरोधकांच्या सर्व डावपेचांना चकवा देत ही जोडी प्रभागात आघाडीवर असल्याचे स्पष्ट संकेत जनतेतून मिळत आहेत.
प्रभागातील प्रत्येक गल्लीत, प्रत्येक वॉर्डात भाजपचा झेंडा अधिक घट्ट रोवला जात असून, विरोधक चारही बाजूंनी अडचणीत सापडल्याचे दिसत आहेत. “सर्व किल्ले भेदून भाजपचे हे दोन तारे संपूर्ण शहरात सर्वाधिक आघाडी घेतील आणि त्याचा थेट फायदा नगराध्यक्षपदाच्या लढतीत किरण कापगते यांना होईल,” अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, या निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष असून, प्रभाग १ चा निकाल पाहून विरोधक अवाक् होतील, अशी खात्री भाजप कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. आता केवळ मतदानाची औपचारिकता बाकी असून, भाजपच्या विजयाची उलटी गणती सुरू झाल्याचे चित्र आहे.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!