Saturday, June 6, 2026
Homeभेटमूल येथील कृषि महाविद्यालयात कृषि अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

मूल येथील कृषि महाविद्यालयात कृषि अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

     प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून  डॉ. सुरेश खोंडे माजी संचालक विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे माजी सदस्य, डॉ. वामनराव पवार, माजी विभाग प्रमुख (कृषी विद्या) , तसेच डॉ. मिलिंद राठोड, प्राध्यापक विस्तार शिक्षण, , कृ. म. वि.,, नागपूर यांनी कृषी महाविद्यालय मुल येथे सदिच्छा भेट दिली.

या भेटीच्या वेळी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी महाविद्यालयातील उपक्रम आणि इतर माहिती बाबत चर्चा केली. त्यानी महविद्यालयाच्या       मारोडा ( सोमनाथ) प्रक्षेत्रास भेट दिली. त्यांनी दहा हेक्टर प्रक्षेत्रावर पेरणी करण्यात आलेल्या विविध तेलबिया पिकांची(जवस,मोहरी, करडी,ज्वारी) पाहणी केली. त्यापूर्वी त्यांनी महाविद्यालयाच्या विविध प्रयोगशाळा , पोलिहाउस, ग्रीनहाऊस ची पाहणी केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले.

या भेटी दरम्यान केलेल्या पाहणीत महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि इतर उपक्रमाची प्रशंसा केली. या भेटीच्या वेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!