Saturday, June 6, 2026
Homeसत्कारप्राचार्य अशोक झाडे यांचा सेवानिवृत्त प्रसंगी सत्कार समारंभ संपन्न

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

प्राचार्य अशोक झाडे यांचा सेवानिवृत्त प्रसंगी सत्कार समारंभ संपन्न

मूल:– ( मेहुल मनियार )

    मूल येथील नवभारत विद्यालय प्राचार्य पदावर असलेले प्राचार्य अशोक झाडे दि.31/01/2026 ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे
त्यांचा निरोप व सत्कार समारंभ पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाच्या पर्यवेक्षीका सौ .वर्षा भांडारकर, सत्कारमूर्ती प्राचार्य ए एच झाडे ,प्रमुख अतिथी म्हणून प्रा.महेश पानसे ,प्रा.के.जे वासाडे , जी आर चौधरी , प्रा . काटकर आदी उपस्थित होते.
सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व स्व. वि तु नागपुरे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन तथा द्वीपप्रज्वलन करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु . दिपा गोंगल यांनी केले.याप्रसंगी प्रा महेश पानसे , प्रा काटकर प्रा. वासाडे, प्रा कामडी,जी आर चौधरी , प्रतिमा उमक, एन एस माथनकर, प्रा.बोलीवार, प्रा. उगेमुगे यांनी आपले विचार व्यक्त केले. मान्यवर मंडळींच्या हस्ते सत्कारमूर्ती प्राचार्य अशोक झाडे आणि सौ. स्वाती झाडे यांचा सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ, साडी, ड्रेस भेट देऊन विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती प्राचार्य अशोक झाडे यांनी सेवाकालावधीतील जीवनावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषण पर्यवेक्षक सौ. वर्षा भांडारकर यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक श्री. टी. जी. निमसरकर आणि उपस्थितांचे आभार शिक्षीका कु. माधुरी तलांडे यांनी मानले.यावेळी विद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!