Saturday, June 6, 2026
Homeवार्षिक स्नेह सम्मेलनआपल्यामध्ये पूर्ण क्षमता आहे ती वाढवण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा...... कुलगुरू डॉ. एस....

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

आपल्यामध्ये पूर्ण क्षमता आहे ती वाढवण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा…… कुलगुरू डॉ. एस. आर. गडाख यांचे विद्यार्थ्यांना आव्हान.

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )
सामान्यपणे विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे कार्य करण्याची क्षमता असते,त्या क्षमतेला अधिक ताकद देऊन आपल्या जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करावा असे आव्हान पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला चे कुलगुरू डॉ. एस. आर. गडाख यांनी केले.. ते मुल येथील कृषी महाविद्यालयाच्या वतीने कन्नमवार सभागृहात आयोजित FRAGRANCE 2026 वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते आपले विचार व्यक्त करीत होते.
डॉ. एस. आर.गडाख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मान. प्रकाश कडू, ज्येष्ठ रंगकर्मी  डॉ.शेखर डोंगरे, डॉ.ए.व्ही. कोल्हे, मान.काटकर, मान.अमरशेट्टीवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी.अतकरे,डॉ. रमाकांत गजभिये, डॉ. गीतांशू डिंकवार आदी गणमान्य उपस्थित होते.
सर्वप्रथम डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला अतिथी नी दीप प्रज्वलन आणि मालार्पण केले.      डॉ. गजभिये यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विद्यापीठांच्या विविध उपक्रमाबाबत माहिती देतांना महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी जे उपक्रम राबवले जातात त्याबद्दल माहिती दिली. या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत प्राप्त केलेल्या प्रगती बाबत माहिती दिली. सहयोगी अधिष्ठाता डॉ. अतकरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांना न घाबरता पुढे जाण्याचा सतत प्रयत्न करावा असे सांगताना त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सतत प्रयत्नशील असल्याबाबत स्पष्ट केले. जीवनात मिळालेली जबाबदारी स्वीकारून ती पूर्ण करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांसाठी उपक्रम चालविण्यात त्यांना आवड असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.


डॉ. कडू यांनी कृषी महाविद्यालयाची इमारत लवकर व्हावी ही अपेक्षा व्यक्त करताना वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांसाठी आनंदोत्सव असतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडतो असे सांगितले.
डॉ. आर. एन. काटकर यांनी कृषी महाविद्यालयाचे क्षेत्र महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.या क्षेत्रात कार्य करणारा प्रत्येक व्यक्ती सतत गुंतून असतो हे सांगून ज्याप्रमाणे कुंभार मातीला आकार देतो त्याचप्रमाणे महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करतात म्हणूनच विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना संधी देता यावी म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे असे म्हटले.

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.शेखर डोंगरे यांनी सांगितले की,विद्यार्थ्यांच्या अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळावा,यासाठी स्नेहसंमेलन आयोजित केले जातात, हे सांगताना त्यांनी झाडीपट्टी नाट्य महोत्सवा बाबत माहिती दिली. वेळेचे नियोजन करावे कारण मनात ठरवले तर यश नक्की मिळते, त्याचप्रमाणे कोणत्याही कामाचे कौतुक झाले तर प्रेरणा मिळते हे सांगताना त्यांनी आपल्या 35 वर्षापासून नाट्य क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल माहिती दिली. झाडीपट्टी नाट्य क्षेत्राला पाहिजे त्या प्रमाणात मदत मिळत नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केला.
या कार्यक्रम प्रसंगी डॉ. गीतांशू डिंकवार, डॉ.नागेश नवघरे,डॉ. स्वप्निल ठाकरे, डॉ. अक्षय इंगोले डॉ. रमाकांत गजभिये श्री.मुलगीर आणि धोटे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. गडाख यांनी पुढे म्हटले की मुल येथील कृषी महाविद्यालयाची इमारत लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. या क्षेत्राचे आमदार आणि माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार तर्फे यासाठी प्रयत्न होत असल्याचे सांगितले.या महाविद्यालयाच्या विकासासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ.अतकरे यांच्या विशेष प्रयत्नामुळे एक कोटी बारा लाख रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे हे सांगताना त्यांनी डॉ. अतकरे यांच्या कार्याची प्रशंशा केली. या महाविद्यालयात फोरम तयार करा,विद्यार्थ्यांसाठी कोचिंग द्या,तसेच जॉब देणारा विद्यार्थी घडवा असे बोलतांना यासाठी विद्यापीठ पूर्णपणे मदत करेल असे आश्वासन सुद्धा दिले.विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले की जीवनात सकारात्मक विचार करणारे चांगले मित्र मिळवा आणि आपली प्रगती करा.

   या प्रसंगी कु. चैताली बेलेकर आणि कु. महारुख शेख यांच्या बहारदार नृत्यामुळे कार्यक्रमांची शोभा वाढली.
या कार्यक्रमाचे संचालन कु. चैताली बेलेकर, समय उपरीकर तसेच डॉ. प्रवीणा बरडे यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ.अक्षय इंगोले यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालया चे सर्व प्राध्यापक वर्ग. कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!