Saturday, June 6, 2026
Homeशिव राज्याभिषेक दिनभारतीय जनता पार्टी मूल च्या वतीने ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

भारतीय जनता पार्टी मूल च्या वतीने ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

मूल ( मेहुल मनियार )

       : भारतीय जनता पार्टी, मूल शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या राष्ट्रनिष्ठा, स्वराज्याची संकल्पना, सुशासन आणि सर्वसमावेशक नेतृत्व यांचे महत्त्व विशद केले. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे आजही प्रेरणादायी असून युवकांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजहित व राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचा संकल्प केला.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!