Thursday, April 23, 2026
Homeएकपात्री अभिनय स्पर्धादेवनिल विद्यालय टेकाडी येथे जिल्हास्तरीय आंतरशालेय एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

देवनिल विद्यालय टेकाडी येथे जिल्हास्तरीय आंतरशालेय एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न

मूल ( मेहुल मनियार )

      विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित देवनिल विद्यालय टेकाडी येथे संस्थेच्या उपाध्यक्षा स्व.निलिमाताई भांडेकर यांच्या पंधराव्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय आंतरशालेय एकपात्री अभिनय स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक गटासाठी आयोजन करण्यात आली.

समाजातील अज्ञान,अंधश्रद्धा, विघातकरुढ्या आदी विषयांवर प्रबोधन करण्याच्या दृष्टीने एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत दोन्ही गटात जिल्ह्यातील एकूण ३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला.प्राथमिक गटात घेण्यात आलेल्या एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रथम- प्रगती उमाकांत पाल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोंडाळा बुज, द्वितीय- अनन्या श्रीकृष्ण निकेसर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा फिस्कुटी, तृतीय- वंश सचिन कोल्हटवार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टेकाडी, प्रोत्साहनपर- अभिनव मुर्लिधर सोपनकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गडीसुर्ला,कोमल जथ्थु गोहणे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टेकाडी आणि माध्यमिक गटात प्रथम- रुतु मधुकर गेडाम विश्वशांती विद्यालय मारोडा, द्वितीय- वैदवी पितांबर फुलझेले प्रविणभाऊ आडेपवार विद्यालय निपंद्रा, तृतीय-सिमरन सुनील उईके देवनिल विद्यालय टेकाडी तर प्रोत्साहनपर-आचल चरणदास जेंगठे स्व.बापुजी पा.हायस्कुल राजगड , तमन्ना आरीफ शेख देवनिल विद्यालय टेकाडी यांनी प्राप्त केला.   

         याप्रसंगी विजेत्या स्पर्धकांसह ,माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२५ मधील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी प्रथम- सुयोग गजानन वसाके, द्वितीय- प्रथमेश मार्कंडी गोहणे, तृतीय- भुवन सुनील कोटरंगे आणि मुलींमधुन प्रथम- प्रवज्या मुकेश रामटेके यांनाही मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.तसेच राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत घेण्यात आलेल्या शिक्षक कर्मचारी स्पर्धेत राज्यस्तरीय सुडोकू स्पर्धेत दहावा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल गणेश श्रीरामे तर विभागीय स्पर्धेत शोधनिबंध नामदेव पिजदुरकर, वक्तृत्व स्पर्धेत संदीप धाबेकर आणि सुलेखन स्पर्धेत मनोहर मडावी यांनी सहभाग घेतल्याबद्दल विद्यालयाचे वतीने सत्कार करण्यात आला.
समारोपिय आणि बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार देवरावजी भांडेकर अध्यक्ष विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळ मुल हे होते, बक्षीस वितरक म्हणून संस्थेचे सदस्य प्रभाकरराव वासेकर गडचिरोली ,विशेष अतिथी संस्थेचे सचिव डॉ.महेश भांडेकर, उपाध्यक्षा डॉ . स्मिताताई भांडेकर, सामाजिक कार्यकर्ता तथा माजी विद्यार्थी मंगेश पोटवार, सेवानिवृत्त प्राचार्य गंगाधर कुणघाडकर, प्राचार्य रमेश मंडलवार, मुख्याध्यापक राजेश सावरकर,प्रा.रायपुरे, प्रिया चेपुरवार, धिरज रामटेके आदींची उपस्थिती होती.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश सावरकर यांनी केले तर सुत्रसंचालन अंकिता चहांदे आणि आभार प्रदर्शन वैशाली भांडेकर यांनी केले.कार्यक्रम आयोजनासाठी नामदेव पिजदुरकर, संदिप धाबेकर, मनोहर मडावी, रविंद्र तुपकर, पुरुषोत्तम खोबे, आत्माराम सुरजागडे, विनोद मंगाम, भुपेश भोयर सचिन कोल्हटवार, विद्यार्थी प्रतिनिधी साहिल मांदाडे, आनंद भोयर,समृध्दी नागोसे आणि स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!