Friday, April 24, 2026
Homeस्वच्छता अभियानस्वच्छता ही सेवा उपक्रमाचा 500 वा टप्पा उत्साहात साजरा

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा 500 वा टप्पा उत्साहात साजरा

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

          मूल येथील कृषि महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाचा 500 वा टप्पा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, डॉ. आशिष लाडे  यांनी करताना राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. तसेच ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान मा. सहयोगी अधिष्ठाता यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असल्याचे सांगितले. डॉ. रमाकांत गजभिये, प्राध्यापक (उद्यानविद्या) यांनी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर फणसाच्या रोपांची लागवड तंत्रज्ञान व त्यांचे फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली. प्रा. चंद्रकांत मणियार, वरिष्ठ पत्रकार, मुल यांनी राष्ट्रीय सेवा योजनेत  त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. डॉ. अतकरे यांच्या स्वच्छतेबाबत चालू असलेल्या उपक्रमाची प्रशंशा केली. दीपक देशपांडे अध्यक्ष, ग्राहक मंच, मुल यांनी मोहिमेला शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हिताचे जतन करावे, असे आवाहन केले.  विनोद इंगोले, वरिष्ठ विदर्भ प्रतिनिधी, ॲग्रोवन यांनी ऐतिहासिक कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे कौतुक करून पुढेही अशीच कार्यप्रवृत्ती कायम ठेवण्याच्या शुभेच्छा दिल्या.

सोहम बुटले, अध्यक्ष युवा वॉरियर्स चंद्रपूर, यांनी विद्यार्थ्यांना डॉ. विजय अतकरे यांच्या आदर्शाचे अनुकरण करून स्वच्छतेचा संकल्प करण्याचे आवाहन केले. डॉ. जयश्री गलगलीकर, आर्ट ऑफ लिव्हिंग, वरिष्ठ प्रशिक्षक नागपूर यांनी पर्यावरणातील वाढत्या कचऱ्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी माहिती देत ‘स्वच्छता हीच सेवा’ हे मूल्य अंगीकारण्याचे आवाहन केले. श्री. चंद्रशेखर गलगलीकर, आर्ट ऑफ लिव्हिंग, वरिष्ठ प्रशिक्षक व समाजसेवक यांनी सेवेचे महत्त्व अधोरेखित करत कविता सादर केली व विद्यार्थ्यांना सेवेमार्फत जीवनात सकारात्मक बदल घडवण्यास प्रेरित केले.

   या कार्यक्रमात मान्यवर अतिथींचा महाविद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ आणि तुळशीच्या झाडाची कुंडी देऊन सत्कार करण्यात आला

      सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय अतकरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून  मे 2017 पासून सुरू झालेल्या स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचा 500 वा टप्पा गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली व हा उपक्रम पुढेही सातत्याने चालू ठेवण्याचे आवाहन केले. वृक्षारोपणाविषयी बोलताना त्यांनी फणसाचे झाड ‘कल्पवृक्ष’ असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी आपल्या घरी, शेतात व नातेवाईकांकडे त्याची लागवड करावी, असे आवाहन केले. तसेच आजपर्यंत सहकार्य केलेल्या सर्व विद्यार्थी व अधिकारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गीतांशू डिंकवार, सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. नागेश नवघरे, सहाय्यक प्राध्यापक, मृद विज्ञान यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रांगणात स्वच्छता अभियान राबविण्यात आले व सोमनाथ येथील प्रक्षेत्रावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  सुमारे 70 फणसाच्या रोपांची लागवड करण्यात आली.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!