Friday, May 1, 2026
Homeसत्कारसुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मिळवून दिलेल्या जास्तीच्या सिलेंडर कोट्याचे यशस्वी नियोजन

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मिळवून दिलेल्या जास्तीच्या सिलेंडर कोट्याचे यशस्वी नियोजन

भारतीय जनता पक्षाने केले तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्याचे अभिनंदन

मूल ( मेहुल मनियार )

        मुल शहरात व परिसरात मागील काही दिवसापासून सिलेंडर ची मोठी समस्या निर्माण झाली होती, अनेकांना सिलेंडर अभावी चुलीवर स्वयंपाक करावा लागला. उन्हाळ्याच्या कडक उन्हात अनेक जण सिलेंडर साठी दिवसभर लाईन लावून राहत होते. ही समस्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या लक्षात आणून दिली तसेच मुलच्या तहसीलदार मृदुला मोरे आणि पुरवठा अधिकारी शिरभाते यांना निवेदन सादर केले. तहसीलदार मोरे यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी, गॅस एजन्सी चे प्रतिनिधी यांच्या समवेत एक बैठक घडवून आणली, व आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मुल शहराला एका दिवसात कोटा वाढवून जास्तीचे सिलेंडर द्यायला लावले. बैठकीत व्यवस्थित नियोजन करण्यात आले. एक आठवडा महात्मा फुले आठवडी बाजारात नागरिकांना वेटिंग लिस्ट स्थानिक व्हाट्सअप्प ग्रुप वर प्रसारित करून अगदी नियोजनबद्ध वाटप करण्यात आले, परिणामतः शहरातील नागरिकांना अगदी एका आठवड्यात सिलेंडर समस्येवर तोडगा मिळाला, सदर प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, विविध सामाजिक स्संस्थांचे कार्यकर्ते, नागरिक यांनी सहकार्य केले, विशेषतः तहसीलदार मृदुला मोरे आणि पुरवठा अधिकारी शिरभाते यांनी केलेल्या यशस्वी नियोजनासाठी आज दिनांक 1 मे 2026 ला महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले, व शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत दोन्ही अधिकाऱ्यांना धन्यवाद देण्यात आले. शिष्टमंडळात शहर अध्यक्ष प्रवीण मोहूर्ले,भाजप नेत्या सौ. किरण कापगते, माजी नगराध्यक्ष सौ उषाताई शेंडे, जीवन कोंतमवार, माजी नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, नगरसेविका सौ. प्राची आक्केवार, सौ. अश्विनी निकोडे, महासचिव जितू टिंगूसले, युवा मोर्चा शहर अध्यक्ष पंकज लाडवे, माजी नगरसेवक अनिल साखरकर, राकेश ठाकरे, ओबीसी आघाडी अध्यक्ष युवराज चावरे, विवेक मांदाडे, संदीप मोहबे, प्रशांत कोहळे, वंश बोबाटे, कुमुदिनी भोयर, आयेशा शेख, गौतम जीवने, सुनील कुकुडकर, वैश्णवी कोलप्याकवार , प्रवीण मोहूर्ले चिमढा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!