Monday, June 15, 2026
Homeनेत्रदान जागरूकताजागतिक नेत्रदान दिन : अंधाराला प्रकाश देणारे असे सर्वश्रेष्ठ दान* नेत्रदान..

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

जागतिक नेत्रदान दिन : अंधाराला प्रकाश देणारे असे सर्वश्रेष्ठ दान* नेत्रदान..

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

          डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय मुल येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव (RAWE) या कार्यक्रमांतर्गत अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील पारडी येथे नेत्रदान जागरूकता कार्यक्रम आयोजित केला.

दरवर्षी १० जून रोजी ‘जागतिक नेत्रदान दिन’ साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश फक्त एकच – डोळे बंद झाल्यावरही एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश आणण्याची शक्ती आपल्यात आहे, हे समाजाला पटवून देणे. कृषी महाविद्यालय मुल आयोजित जागतिक नेत्रदान दिन या कार्यक्रमांमध्ये कृषीदूतांनी गावकऱ्यांमध्ये जागतिक नेत्रदान दिन या विषयाबद्दल मार्गदर्शन व जनजागृती केली . तसेच कृषी दूतांनी नेत्रदान हे का गरजेचे आहे याचे महत्व वेगवेगळ्या उदाहरण स्वरूपात शेतकऱ्यांमध्ये व गावकऱ्यांमध्ये स्पष्टीकरण करून सांगितले.
नेत्रदान म्हणजे काय?
मृत्यूनंतर आपल्या डोळ्याचा पारदर्शक भाग, ज्याला ‘कॉर्निया’ (नेत्रपटल) म्हणतात, तो गरजू रुग्णाला दान करणे म्हणजे नेत्रदान. यासाठी संपूर्ण डोळा काढावा लागत नाही, फक्त पारदर्शक पडदा दान होतो.
एक दान, दोन आयुष्य उजळतात
एका व्यक्तीचे दोन डोळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी देऊ शकतात. भारतात सध्या लाखो लोक कॉर्निया अंधत्वाने ग्रस्त आहेत. यापैकी 80% लोकांना फक्त एका कॉर्निया प्रत्यारोपणाने पुन्हा दिसू शकते. पण दानकर्त्यांच्या कमतरतेमुळे दरवर्षी हजारो रुग्ण दृष्टीची वाट पाहत राहतात
त्याचबरोबर कृषिदुतांनी गावकऱ्यांमध्ये नेत्रदानाचे विविध गैरसमज अडीअडचणी दूर करून शंकांचे निरसन करण्याचा एक प्रयत्न केला.

महत्वाचे गैरसमज – आणि त्यांचे स्पष्टीकरण:
म्हाताऱ्या व्यक्तीचे डोळे उपयोगी नसतात

 1 ते 100 वयापर्यंत कोणाचंही नेत्रदान होऊ शकते. कॉर्निया निरोगी असणं महत्त्वाचं.
चष्मा आहे, ऑपरेशन झालंय, मधुमेह आहे म्हणून डोळे दान होत नाहीत.
सत्य  चष्मा, कॅटरॅक्ट ऑपरेशन झालेल्यांचेही डोळे चालतात. फक्त कॅन्सर, एड्स, हिपॅटायटिस B/C, रेबीज सारखे काही आजार अपवाद.
मृत्यूनंतर डोळे काढायला वेळ लागतो.
 मृत्यूनंतर फक्त 6 तासांची वेळ असते.
नेत्रदानासाठी काय करावे?
जिवंतपणी ‘आय डोनेशन पेज’वर नाव नोंदणी करा. आपल्या कुटुंबीयांना आपली इच्छा सांगा. कारण मृत्यूनंतर अंतिम निर्णय कुटुंबाच असतो. एका सहीने तुम्ही दोन घरात दिवाळी आणू शकता.
‘दृष्टी’ सारखं अमूल्य दान फक्त माणूसच देऊ शकतो. आपण गेल्यावर आपले डोळे दुसऱ्याला जग पाहू देतील, यापेक्षा मोठं पुण्य नाही.
कृषी दूतांचा संदेश शेतकरी बांधवांसाठी:
या जागतिक नेत्रदान दिनी संकल्प करूया – ‘मी जगेन तोपर्यंत माझ्यासाठी, मी गेल्यावर दुसऱ्यांसाठी. असा संदेश देत कृषीदुतांनी जागतिक नेत्रदान दिन या कार्यक्रमांमध्ये नेत्रदानाबद्दल जनजागृती व मार्गदर्शन केले.

कृषी महाविद्यालय मुलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही.जी. अतकरे यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. तसेच कार्यक्रम समन्वयक डॉ. आर.पी.गजभिये,
कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष लाडे, व सोनापुर,गडचिरोली येथील कृषी संशोधन केंद्र, प्रभारी डॉ.गणवीर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.जागतिक नेत्रदान दिन या जनजागृती कार्यक्रम यामध्ये प्रामुख्याने उपस्थित गावातील गावकरी, तरुण वर्ग ,विद्यार्थी, आणि शेतकरी वर्ग उपस्थित होऊन आपला अमूल्य सहभाग नोंदवला.

कृषी महाविद्यालय, मुल येथील विद्यार्थी कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने,माहिती मार्गदर्शन,माहिती स्पष्टीकरण हे अथर्व डोंगरे यांनी केले. व सोबत गुरुदेव असोले ,श्रीराम धनजोडे , व अनिकेत फरकडे या विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घेतला.

हा कार्यक्रम खरोखर समाधानकारक व प्रेरणादायी ठरला असून. व यशस्वीरित्या पार पडला असे उपस्थितांचे मत आहे.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!