Wednesday, June 17, 2026
Homeबीज उगवण क्षमताबीज उगवण क्षमता बद्दल विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

लोकहित समाचार मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून लोकहित समाचार संपादक प्रकाशक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. या मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता लोकहित समाचार पाहू शकत नाही बातमी लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार संबंधित वार्ताहर लेखक किंवा जाहिरातदारच आहे.

बीज उगवण क्षमता बद्दल विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

मुल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

   पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्नित कृषि महाविद्यालय, मूल येथील विद्यार्थ्यांतर्फे ग्रामीण कृषि कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत इंडाळा गावात शेतकरी बांधवांसाठी पेरणीपूर्वी बीज उगवण क्षमता चाचणी (Seed Germination Test) प्रात्यक्षिक कार्यक्रम ११ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करून दर्जेदार व योग्य बियाण्यांची निवड करणे, रोगमूक्त बियाण्यांचीलागवड करणे तसेच शेतीत भरघोश उत्पादन मिळवणे हा होता. या कार्यक्रमादरम्यान गोणपाट पद्धतीने (Gunny Bag Method) बीज उगवण चाचणी घेण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात योग्य अंतर ठेवण्यात आले.

या मध्ये १०० बियाणे १० ओळींमध्ये योग्य अंतर ठेवून ओलसर गोणपाटामध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर १० ते १२ दिवसांच्या ठराविक कालावधीनंतर उगवलेल्या बियांची संख्या मोजून उगवण टक्केवारी निश्चित करण्याची पद्धत समजावून सांगण्यात आली.शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीज उगवण चाचणी केल्यास बियाण्यांची प्रत्यक्ष उगवण क्षमता समजते, दर्जेदार व निरोगी बियाण्यांची निवड करता येते आणि कमकवत व निष्कर्ष बियाणे पेरणीपासून टाळता येतात.

निरोगी व चांगली उगवण क्षमता असलेल्या बियाण्यांची निवड केल्यास शेतातील रोपांची संख्या एकसमान राहते, पिकांची वाढ जोमदार होते आणि शेवटी अधिक व दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते,असे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उगव क्षमता कमी असलेल्या बियाण्यांचा वापर केल्यास रोपांची संख्या घटते. पिकांची वाढ असमान होते आणि उत्पादनात घट येण्याची शक्यता वाढते. उगवण क्षमता माहिती नसल्यामळे शेतकऱ्यांना वारंवार बियाणे खरेदी करावे लागते. त्यामूळे अतिरिक्त आर्थिक खर्च होतो, पेरणीस विलंब होऊन वेळेची हानी होते आणि शेवटी उत्पादनातही घट होण्याची शक्यता वाढते.

     या उपक्रमात  कृषी महाविद्यालयाच्या स्वयम जथाडे, चेतन कापगते आणि रोहित राऊत या विद्यार्थ्यांनी शेतकच्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास गावातील शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत वैज्ञानिक पद्धतीने बियाण्यांची निवड करण्याबाबत माहिती जाणून घेतली.

या उपक्रमासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी अतकरे , कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. पी
गजभिये, कृषि संशोधन केंद्र प्रभारी डॉ. गणवीर,कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष लाडे आणि प्राध्यापक डॉ. सुवर्णा नगराळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला हा उपक्रम शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांची निवड व उत्पादनवाढीसाठी उपयुक्त
ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Mehul Chandrakant Maniyar
90396656609039665660
संबंधित खबरे

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

error: Content is protected !!